Siolim: शिवाेलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण 19 फेब्रुवारी रोजी; मुख्यमंत्री सावंत, नितेश राणेंची उपस्थिती

Siolim Chhatrapati Shivaji Maharaj statue: शिवाेली येथील थिएटर जंक्शन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Siolim News
Siolim Chhatrapati Shivaji Maharaj statueDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: शिवाेली येथील थिएटर जंक्शन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. ‌प्रमोद सावंत तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थित होणार असल्याची माहिती मठाचे संस्थापक नीलेश वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या परिषदेला मठ समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. १९ फेब्रुवारी रोजी शिवोलीतील सेवाभावी डॉक्टर (दिवंगत) दत्ता नायक यांच्या स्मरणार्थ शिवोलीतील मुख्य मार्गापासून त्यांच्या घरापर्यंत गेलेल्या रस्त्याचे ‘डॉ. दत्ता नायक’ असे नामकरण करण्यात येणार आहे.

Siolim News
Siolim Oshel: 'ओशेल झऱ्या'च्या परिसरातील बांधकाम पुढील सुनावणीपर्यंत बंद; प्रकल्प मालकाची तोंडी हमी

भाविकांनी २६ जानेवारीला मठाचा वर्धापनदिन तसेच १९ फेब्रुवारीच्या शिवजयंती सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नीलेश वेर्णेकर तसेच समर्थन संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर, तसेच नितीन आगरवाडेकर यांनी केले आहे.

Siolim News
Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांना समजून घेणारा कधीच पराभूत होणार नाही.! प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन

२६ रोजी मठात दिवजोत्सव तसेच जोडवी जाळण्याचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता समीर शिरोडकर पुरस्कृत ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाचा प्रयोग होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com