Congress candidates in goa
Congress candidates in goaDainik Gomantak

पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न, राहुल गांधींच्या उपस्थितीत उमेदवारांना शपथ

आम आदमी पार्टीने यापूर्वी उमेदवारांना पक्षांतर विरोधी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करायला लावली होती

पणजी : गोव्यातील पक्षांतराचे वारे सर्वांच्या परिचयाचे आहे. नेते आपला पक्ष कधी सोडतील हे पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील माहिती पडत नाही. याच पार्श्वभूमीवर गोव्यातील पक्ष प्रमुख विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या वेगवेगळ्या पद्धतीने शपथ घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या उमेदवारांना शपथ दिल्या आहेत.

Congress candidates in goa
देवेंद्र फडणवीस बांदोडकरांसह पर्रीकरांच्या आठवणीत भाऊक, म्हणाले..

दरम्यान, निवडणुकीनंतर (elections) पक्षांतर न करण्याची शपथ यावेळी उमेदवारांनी घेतली आहे. 2017 मध्ये गोव्यात काँग्रेसने 40 पैकी 17 जागा जिंकल्या आणि भाजपने 13 जागा जिंकल्या. परंतु 2019 मध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर (Babu Kavlekar) यांच्या नेतृत्वाखाली 15 काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यांना भाजपने उपमुख्यमंत्री केले.

"मंदिर, मशीद आणि चर्चसमोर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शपथ घेतली आहे. आज आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर शपथ घेतली आहे," असे काँग्रेसचे (Congress) उमेदवार संकल्प आमोणकर यांनी माहिती दिली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी, अंगणवाडी कर्मचारी आणि इतरांशीही संवाद साधला. आज त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला तसेच उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तसेच 10 मार्चला मतमोजणी आहे.

Congress candidates in goa
संजय राऊतांची गोवा भाजपवर सडकून टीका, म्हणाले, भाजप सरकार माफीयांचे..

आम आदमी पार्टी (AAP) ने यापूर्वी उमेदवारांना पक्षांतर विरोधी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करायला लावली होती. राहुल गांधी याआधी 2 फेब्रुवारीला भेट देणार होते, पण संसदेमुळे आणि शहीदांच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी रायपूरच्या भेटीमुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com