Goa Milk Production: राज्यात दुग्धोत्पादनात लक्षणीय वाढ

Goa Milk Production: दिलासादायक: फेब्रुवारी 2022 ते मार्च 2023 दरम्यान 6 कोटी लिटर उत्पादन
milk-production
milk-productionDainik Gomantak
Published on
Updated on

धीरज हरमलकर

Goa Milk Production: राज्यात मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत दूध उत्पादनात लक्षणीय वाढ नोंद झाली आहे. या कालावधीत एकूण दूध उत्पादन 6 कोटी 41 लाख 75 हजार 524 लिटर होते. तर मार्च 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत एकूण दूध उत्पादन 6 कोटी 32 लाख 5 हजार 540 लिटर होते.

milk-production
Goa Accident News: डिचोलीत दोन वेगवेगळे अपघात; पर्यटक महिलेसह दोघे जखमी

राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील दुधाच्या वार्षिक उत्पादनाचे नियोजन पशुसंवर्धन विभाग पाहतो. उपलब्ध माहितीनुसार, मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राज्यातील दुग्धोत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत वरील कालावधीत प्रतिदिन सरासरी दूध उत्पादनातही वाढ झाली आहे. मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०३ या वर्षासाठी प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन १लाख७५हजार ८२३ लिटर होते. मार्च २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या वर्षासाठी प्रतिदिन सरासरी १ लाख ७३ हजार १६५ लिटर दूध उत्पादन होते.

मार्च २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या उन्हाळी हंगामात एकूण दूध उत्पादन १ कोटी ८७ लाख ७२ हजार ५९६ लिटर, पावसाळ्यात २कोटी६६लाख ५५हजार ५२८ लिटर आणि हिवाळ्यात १ कोटी ७८लाख ६७ हजार ४१६ लिटर होते. खासकरून पावसाळ्यात दूध उत्पादनात वाढ दिसून आली.

पावसाळ्यात उत्पादन वाढीची नोंद

मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या उन्हाळी हंगामात एकूण दूध उत्पादन १कोटी ९६ लाख ३९हजार ९५ लिटर, पावसाळ्यात २ कोटी ६१लाख४७ हजार ४० लिटर आणि हिवाळ्यात १ कोटी ८३ लाख ८९ हजार ३८९ लिटर होते.

milk-production
Goa Crime News: माझी लढाई उद्याच्‍या अनेक शिवानी जिवंत राहण्‍यासाठी

यावर्षीही पावसाळ्यात दूध उत्पादनात वाढ दिसून आली. उत्तर गोव्यात वार्षिक एकूण दूध उत्पादन ३ कोटी ५४ लाख ७२ हजार ६९६ लिटर होते. दक्षिण गोव्यात मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ते २ कोटी ८७ लाख २ हजार ८२८ लिटर होते. ही आकडेवारी पाहता हे दिसून येते की, मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राज्यात दुग्धोत्पादन वाढीस लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com