Goa Politics: 'श्रीपाद यांनी विश्रांती घ्‍यावी' माजी आमदार दयानंद सोपटे, भाजपच्या पक्षशिस्तीला डाग

Goa Politics: सोपटे उवाच : परुळेकरांप्रमाणेच लोकसभेच्‍या उमेदवारीसाठी दर्शविली तयारी
 Shripad Naik
Shripad Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून श्रीपाद नाईक यांच्याऐवजी निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार दयानंद सोपटे यांनीही आता तयारी दाखवली आहे. याआधी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनीही अशीच तयारी दाखवली आहे.

 Shripad Naik
Goa Casino: जाणून घ्या, पर्यटकांना का आकर्षित करते गोव्यातील कॅसिनो?

सोपटे यांनी तर 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर नाईक यांनी इतरांना संधी द्यावी आणि मार्गदर्शकाची भूमिका आपल्याकडे घ्यावी असे सुचवले आहे. भाजपमध्ये अशी उमेदवारी जाहीरपणे मागण्याची पद्धती नाही. मात्र, पक्षशिस्तीची दारे आता किलकिली होताना दिसत आहेत.

श्रीपाद नाईक हे आपल्यासाठी आदरणीयच आहेत असे सांगून सोपटे यांनी नाईक यांनी भाजपच्या माध्यमातून देशाची व जनतेची 40 वर्षे सेवा केल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, प्रत्येकाच्या घरात ज्येष्ठ असतात. ते कुटुंबासाठी कष्ट उपसत असतात. तसेच नाईक पक्षासाठी, जनतेसाठी काम करत आहेत.

माझ्यासाठी अनेकांना वाटते नाईक यांनी आता तरी विश्रांती घ्यावी. आम्हाला त्यांचे मन दुखवायचे नाही. ज्येष्ठ वयात व्यक्तीला जरा विसावा हवा असतो. त्यासाठी नाईक यांनी स्वतःहून निर्णय घ्यावा, नव्या पिढीसाठी संधी द्यावी. भाजपमध्ये उमेदवारी मागितली म्हणून मिळत नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी कशी पार पाडली हे पाहिले जाते.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून श्रीपाद नाईक यांच्याऐवजी निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार दयानंद सोपटे यांनीही आता तयारी दाखवली आहे. याआधी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनीही अशीच तयारी दाखवली आहे.

सोपटे यांनी तर 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर नाईक यांनी इतरांना संधी द्यावी आणि मार्गदर्शकाची भूमिका आपल्याकडे घ्यावी असे सुचवले आहे. भाजपमध्ये अशी उमेदवारी जाहीरपणे मागण्याची पद्धती नाही. मात्र, पक्षशिस्तीची दारे आता किलकिली होताना दिसत आहेत.

ते म्हणाले, की उत्तर गोव्यातील प्रियोळ मतदारसंघ वगळता उर्वरित १९ मतदारसंघात भाजपच्या संघटनात्मक कामासाठी दोन वर्षे मी फिरत आहे. अनेकांच्या संपर्कात आहे. बूथ सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून मतदान केंद्र पातळीवरही संपर्क निर्माण झाला आहे.

वाळपई, डिचोली, थिवी मतदारसंघाचा मी अनेक कार्यक्रम आयोजनासाठी प्रभारी होतो. त्यामुळे उत्तर गोव्यातील मतदारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी मी नवा नाही. पक्ष संघटनेचे काम मी करत आहे. उद्यापासून २० मतदारसंघात संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी फिरणार आहे. मध्यंतरी तेलंगण विधानसभा निवडणुकीत माझ्यावर काही मतदारसंघाची जबाबदारी दिली होती, तेथेही जाऊन काम केले आहे.

या घडामोडी घडत असतानाच नाईक यांनी मात्र स्थितप्रज्ञतेने याकडे पाहण्याचे ठरवले आहे. ते आज संसदेचे अधिवेशन सुरू झाल्याने दिल्लीत होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निवडणूक जवळ आल्यावर राजकारण गती घेते. आमच्या पक्षात शिस्त असल्याने कोणी माध्यमांकडे जाऊन पक्षाला संदेश पोचवत नसत.

बैठकांत चर्चा होत असे. आता त्यात थोडा बदल झाला आहे. नेत्यांची मते माध्यमातून समजू लागली आहेत. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. त्यांनी अशा गोष्टींची दखल घेऊ नका असे सांगितले आहे. त्यानुसार काम करत पुढे जात आहे. उमेदवारी कोणाला द्यायची की नाही याचा निर्णय पक्षाचा असतो. पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारणे आमच्या हातात असते. त्यामुळे मी काय करावे याचा सल्ला प्रसार माध्यमातून मला कोणी देऊ नये.

याआधी माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप परुळेकर यांनी नाईक हे किती आमदार निवडून आणू शकतात अशी विचारणा करत नाईक यांच्या राजकीय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनीही आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. पर्वरी मतदारसंघातून गोविंद पर्वतकर यांच्यासाठी उमेदवारी मागून घेऊनही नाईक तेथून पर्वतकर यांना निवडून आणू शकले नव्हते याचे उदाहरणही परुळेकर यांनी दिले होते.

 Shripad Naik
Goa Accident Death: राज्यात 2700 अपघातांत वर्षभरात 259 जणांचा मृत्यू

हे सारे घडत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी संसद अधिवेशनामुळे दिल्ली गाठली आहे. तेथे त्यांना सोपटे यांच्या वक्तव्याची माहिती मिळाली. नाईक यांच्याशी बोलून गैरसमज होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे. सोपटे यांच्याशी तानावडे बोलले का याची माहिती मात्र मिळालेली नाही.

तानावडे यांच्या दिल्लीत भेटीगाठी

भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवल्याचे निमित्त साधत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिल्लीत भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. उद्या मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेऊ शकतात.

तानावडे यांनी नड्डा यांची भेट घेऊन मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील निवडणुकांमध्ये पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान नड्डा यांचे नेतृत्व व प्रचारकार्यातील त्यांचा महत्त्वाचा सहभाग या दोन्ही घटकांनी भाजपाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलल्याचे मत तानावडे यांनी व्यक्त केले.

तेलंगणामधील भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्यानिमित्त देखील तानावडे यांनी नड्डा यांचे अभिनंदन केले. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने तानावडे यांनी गोवा भाजपाची सद्यःस्थिती व संघटनात्मक पैलूंबद्दल नड्डा यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच पक्षाची तळागाळातील पोहोच वाढविण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलावीत याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला

राज्य निवडणूक समिती असते. त्यानंतर पक्षाचे संसदीय मंडळ असते. उमेदवारीचा निर्णय प्रत्येकवेळी राज्य पातळीवर निवडणूक समिती आणि केंद्रीय पातळीवर संसदीय समिती घेते. आमदार आणि खासदार यांना पुन्हा उमेदवारी मागावी लागते आणि समिती त्यावर विचार करते. त्यासाठी माध्यमांकडे जाऊन उमेदवारी मागण्याची पद्धत नाही.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com