Goa Artist: हिरांची झाडू विणणे तुकारामांचे कलाकौशल्यच!

सत्तरी तालुक्यात नारळाच्या झावळ्यांच्या हिरांची तसेच शेरणी झाडांच्या हिरापासून ग्रामीण भागात झाडू बनवली जाते. ही एक परंपरा जुनी परंपरा आहे.
Goa Artist |
Goa Artist |Dainik Gomantak

Goa Artist: सत्तरी तालुक्यात ग्रामीण भागात आजही पूर्वापार चालून आलेली परंपरा लोकांनी जपून ठेवली आहे. अशीच एक परंपरा म्हणजे हिरांची झाडू बनविणे. पोडोशे सत्तरी येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम घाडी आजही हिरांची झाडू करीत आहेत. त्यांचे कलाकौशल्य अगदी थक्क करणारे आहे.

नारळाच्या झावळ्यांच्या हिरांची तसेच शेरणी झाडांच्या हिरापासून ही झाडू ग्रामीण भागात बनवली जाते. हिरांची झाडू ही गृहिणीची सोबती असते. ही झाडू घर, अंगण, गोठा, चूल, घराचा परिसर स्वच्छ करीत असते.

ही झाडू झरली की तिचा खुटारा होत असतो. अर्थातच झाडू शेवटपर्यंत साथ देत असते. घर साफ करणे, अंगण झाडणे, शेण सारवणे, गोठा धुताना झाडूचा मोठ्या प्रमाणावर वापर लोक करीत आहेत.

घाडी म्हणाले, आपल्या घरी लोक झाडू नेण्यासाठी येत असतात. हे कसबीचे कला शिक्षण आहे. लहानपासूनच ही कला जोपासली आहे. नारळाच्या झावळ्यांपासून झाडू करतो. तिला मूठ करण्यासाठी कुंबयाचे दोर वापरले जातात.

Goa Artist |
Goa Agriculture: मिरीच्या दरात वाढ; पण उत्पादनात घट

झाडू विणणे एक कसब...

ही झाडू केळसुणी, सळाथी, सारण, खुटारा अशाही नावाने गावात परिचित आहे. हिरांची झाडू विणणे म्हणजे कसब आहे. हिरांना कलात्मक अशी वेणी घालून झाडू करणे हे कौशल्यपणाचे काम असते. कुळागरात नारळाच्या झावळ्या ठराविक कालावधीनंतर जमिनीवर गळून पडतात.

त्या कुजून जातात. पण या झावळ्यातील हिर वेगळे केले तर त्यापासून मजबूत झाडू करता येते. झाडूची मूठ किती घट्ट केली आहे, त्यावरुन झाडूची पारख केली जाते. त्यासाठी बारकाईने हिर विणणे आवश्यक असते.

आपण घरी वापरण्यासाठी ही सारण करतो. हिर काढणे, हिर तासणे, हिर विणणे, त्याची दोरी वळणे व शेवटी झाडू बांधणे म्हणजे किचकटीचे व वेळखाऊ काम असते. ही परंपरागत हस्तकला आहे. ही झाडू विणणे हे सुरेख पद्धतीचे काम असते. या कामात कलात्मकता निश्‍चितच दडलेली आहे. शालेय मुलांनाही प्रशिक्षण दिले जाते. - तुकाराम घाडी, ज्येष्ठ नागरिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com