Panaji News : आईची पुण्याई मोठी, म्‍हणून बाबांची इच्छापूर्ती; सिद्धेश श्रीपाद नाईक यांची भावना

Panaji News : कठीण काळातही ते संकटांशी एकहाती झुंजले
Shripad Naik
Shripad NaikDainik Gomantak

Panaji News :

पणजी, बाबांनी राजकारणात मोठं व्हावं, त्यांनी उंची गाठावी, अशी इच्छा बाबांपेक्षा आईची होती. त्यामुळेच बाबांना राजकारणात कुटुंबापेक्षा समाजासाठी अधिक वेळ देता आला. आज आई नसली तरी तिची पुण्याई आमच्याबरोबर आहे. म्हणूनच बाबांना पुन्हा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले.

ते सलग सहाव्यांदा खासदार झाले. आईच्या पाठबळाशिवाय हे शक्य झाले नसते. आज ती हयात असती तर सर्वाधिक आनंद तिलाच झाला असता, अशी भावना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी सिद्धेश नाईकही उपस्थित होते. त्यांनी तेथून ‘गोमन्तक’शी संवाद साधला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या टीममध्ये दिग्गज राजकारण्यांचा समावेश आहे.

बाबांनाही संधी मिळेल असा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. जवळपास ४० वर्षे सेवा देणाऱ्या बाबांना पुन्हा एकदा राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. नरेंद्री मोदी यांचा त्‍यांच्‍यावर विश्वास असल्यानेच हे शक्य झाले. निश्चितच समस्‍त गोमंतकीयांसाठी ही अभिमानास्‍पद बाब आहे. देशभरातून अनेकांचे शुभेच्छा संदेशही येत आहेत.

परीक्षा घेणारा ‘तो’ कठीण काळ!

१२ जानेवारी २०२१ मध्ये बाबांच्या गाडीला अपघात झाला. तो काळ व प्रसंग आठवला की अजूनही अंगावर शहारे येतात. अत्यंत कठीण प्रसंगातून आम्ही सर्व कुटुंबीय बाहेर पडलो. त्‍या अपघातात आई गेली. तिच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. बाबांनी मृत्यूवर विजय मिळविला. प्रचंड इच्छाशक्ती आणि धैर्यामुळेच ते सावरू शकले. एवढ्या संघर्षानंतर, संकटांनंतरही ते समाजकारण, राजकारणापासून दूर झाले नाहीत. लोकांच्या प्रेमामुळे त्‍यांनी ऐतिहासिक विजय मिळविला, असे सिद्धेश यांनी सांगितले.

Shripad Naik
Yellow Alert In Goa: गोव्यात नऊ जूनपर्यंत यलो अलर्ट; मच्छीमारांना किनारी भागात न जाण्याचा सल्ला

उत्साही अन्‌ अविस्मरणीय सोहळा :

राष्ट्रपती भवनातील अभूतपूर्व शपथविधी सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. अत्यंत उत्साही असे वातावरण तेथे होते. गोव्यातील ५० ते ६० लोक या सोहळ्यासाठी उपस्‍थित होते. बाबांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताना पाहणे खूप आनंदाचा क्षण होता, असे उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश म्‍हणाले.

परीक्षा घेणारा ‘तो’ कठीण काळ!

१२ जानेवारी २०२१ मध्ये बाबांच्या गाडीला अपघात झाला. तो काळ व प्रसंग आठवला की अजूनही अंगावर शहारे येतात. अत्यंत कठीण प्रसंगातून आम्ही सर्व कुटुंबीय बाहेर पडलो. त्‍या अपघातात आई गेली. तिच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. बाबांनी मृत्यूवर विजय मिळविला. प्रचंड इच्छाशक्ती आणि धैर्यामुळेच ते सावरू शकले. एवढ्या संघर्षानंतर, संकटांनंतरही ते समाजकारण, राजकारणापासून दूर झाले नाहीत. लोकांच्या प्रेमामुळे त्‍यांनी ऐतिहासिक विजय मिळविला, असे सिद्धेश यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com