Goa Assembly Monsoon Session 2023 CM Sawant
Goa Assembly Monsoon Session 2023 CM Sawant Dainik Gomantak

Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्यात स्वातंत्र्यसैनिकांची 270 मुले अद्याप सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत

बहुतांश शासकीय विभागांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी ३४२ जागा राखीव
Published on

Goa Assembly Monsoon Session 2023 : स्वातंत्र्यसैनिकांची सुमारे २७० मुले ज्यांना राज्य सरकारने सरकारी नोकरी देऊन सामावून घ्यायला हवे होते, ते अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. जानेवारी २०२१ पर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या केवळ १०० मुलांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या.

पोर्तुगीज राजवटीत गोव्याच्या हितासाठी आपल्या कौटुंबिक, वैयक्तिक जीवनाचा त्याग करून गोवा मुक्तीसाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बहुतांश मुलांच्या पदरी सरकारी नोकरीच्या बाबतीत निराशाच पडलेली दिसते.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जानेवारी २०२१ पर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या सरकारी नोकऱ्यांशी संबंधित अतारांकित प्रश्न विचारला होता. गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर दिले की, गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांची एकूण २७० मुले आहेत. ज्यांना अजून सरकारी नोकरी मिळाली नाही.

Goa Assembly Monsoon Session 2023 CM Sawant
Power Shutdown in Goa: गोव्यातील 'या' भागामध्ये सोमवारी वीज पुरवठा खंडीत

त्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी शासकीय विभागातील रिक्त जागा उपलब्धतेशी संबंधित प्रश्नावर भाष्य करताना सावंत म्हणाले की, बहुतांश शासकीय विभागांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी ३४२ जागा राखीव आहेत.

बहुतेकांचा शैक्षणिक मुद्दा

स्वातंत्र्यसैनिकांची १०० मुले कनिष्ठ विभाग लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, अव्वल कारकून, बहुकार्यकारी व्यक्ती इत्यादी पदावर शासकीय सेवेत आहेत. त्यापैकी बहुतेकांचे शिक्षण मेट्रिकच्या पुढे आहे.

तर २७० लोक ज्यांना अद्याप सरकारी नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यापैकी बहुतेकांचे शिक्षण मेट्रिकपेक्षा कमी आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com