Shripad Naik : म्हापसा अर्बन बँक प्रकरणी श्रीपाद नाईक यांना साकडे!

म्हापसा अर्बन बँकेमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी पुर्नमागणी ठेवीदारांनी केली आहे.
Shripad Naik
Shripad Naik Gomantak Digital Team
Published on
Updated on

आरबीआयने मोडीत काढलेल्या म्हापसा अर्बन बँकेत पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेल्या लोकांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती प्रतीक्षा प्रभाकर साळगांवकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

म्हापसा अर्बन बँकेत झालेल्या कथित गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बँकेने 2015 मध्ये वरील बँकेवर निर्बंध घातले. त्यानंतर बँक मोडीत काढून लिक्विडेटर नेमला. संबंधित लिक्विडेटरने सुमारे 90 टक्के ठेवीदारांना 249 कोटी रुपये परत केले आहेत. परंतु, पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्यांना प्रत्येकी केवळ पाच लाखच परत केले आहेत.

Shripad Naik
Cannes Film Festivel : अन् कॅप्टन जॅक स्पॅरोसाठी सगळे टाळ्या वाजवत उभे राहिले....कान्समध्ये जॉनी डेपला स्टँडिंग ओवेशन व्हिडीओ व्हायरल

सुमारे 73 कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम परत मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती प्रतीक्षा साळगांवकर यांनी केली आहे. तसेच लिक्वीडेटर अँथनी डिसा तसेच आरबीआय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन गेली 8 वर्षे अडकलेल्या ठेवी परत द्याव्यात, अशी विनंती निवेदनातून केली आहे.

Shripad Naik
Mosquito Coil Side Effects: सिगारेटपेक्षा मॉस्किटो कॉइलचा धुर आरोग्यासाठी धोकादायक

कष्टाची कमाई बॅंकेत!

दिवाळखोरीत काढलेल्या म्हापसा अर्बन बँकेमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी पुर्नमागणी ठेवीदारांनी केली आहे. तसेच असहाय्य निष्पाप ठेवीदारांची चूक नसताना २०१५पासून म्हापसा अर्बन बँकेद्वारे अडकलेल्या, नाकारलेल्या कष्टाच्या ठेवींवरील देय व्याजाचा समावेश नाही. त्याचप्रमाणे, अनेकांनी कष्टाची कमाई बँकेत अडकून राहिलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com