Lairai Jatrotsav: भक्तांच्या हाकेला धावणारी आई, श्री देवी लईराई! शिरगावात भक्तगणांचा महापूर

Lairai Jatrotsav Temple Shirgao: देश-विदेशातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रेला अवघेच क्षण बाकी असून संपूर्ण शिरगावात उत्साहवर्धक आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
lairai devi Jatrotsav
lairai devi templeDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: ‘भक्तांच्या हाकेला धावणारी आई’ असा ज्या देवीचा महिमा आहे, त्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेसाठी धोंड भक्तगण सज्ज झाले असून, लाखो भाविकांना देवीच्या दर्शनाची आस लागून राहिली आहे. उद्या, शुक्रवारी लईराईची जत्रा साजरी होणार असली, तरी दूरदूरच्या भाविकांची पावले आदल्या दिवशीच शिरगावकडे वळली होती.

देश-विदेशातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रेला अवघेच क्षण बाकी असून संपूर्ण शिरगावात उत्साहवर्धक आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो भक्तगणांचे अग्निदिव्याकडे लक्ष लागून राहिले आहे. कधी एकदा अग्निदिव्य करायला मिळते, त्याची तमाम व्रतस्थ धोंड भक्तगणांना उत्सुकता लागून राहिली आहे.

जत्रोत्सवानिमित्त शिरगावात आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, वेगवेगळ्या दुकानांची फेरीही भरली आहे. एकंदरीत श्री लईराईच्या उत्सवासाठी भाविक सज्ज झाले आहेत.

शिरगावची श्री लईराई देवी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या जत्रोत्सवाला धोंड भक्तगणांसह भाविकांची प्रचंड गर्दी उसळते.

शेजारील राज्यांसह गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. विदेशी पर्यटकांनाही या जत्रेचे आकर्षण असून अनेक पर्यटक यानिमित्ताने शिरगावात येतात. जत्रा काळात शिरगावात भक्तगणांचा महापूर लोटतो.

यंदा तीन लाखांहून अधिक भक्तगण शिरगावात येणार असल्याचा देवस्थान समितीला विश्वास आहे. जत्रेच्या पूर्वदिनी आज (गुरुवारी) पूर्ण शिरगावात भक्ती आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. लईराई देवीचा जयघोषही कानी पडत आहे.

Shri Lairai Temple Jatrotsav
Shri Lairai Temple JatrotsavDainik Gomantak

व्रतस्थ धोंडगण सज्ज...

होमकुंड हे शिरगावच्या जत्रेचे खास वैशिष्ट्य. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने होमखंडी कुटुंबातर्फे होमकुंड रचण्यात येते. होमकुंड रचण्याचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री श्री देवीचा कळस मंदिरातून बाहेर काढल्यानंतर होमकुंडाला अग्नी देण्यात येईल. मध्यरात्रीनंतर ‘लईराईमाता की जय’, आदी जयघोष करीत हजारो व्रतस्थ भक्तगण अग्निदिव्य करतील. सर्वांत शेवटी देवी अग्निदिव्य करणार आहे.

lairai devi Jatrotsav
Shri Lairai Jatrotsav: 1 कोटींची आर्थिक उलाढाल अपेक्षित! लईराईच्या जत्रोत्सव तयारीला वेग, धोंड ‘तळ’ फुलले

यंत्रणा तैनात

संपूर्ण गोमंतकासह देश-विदेशात ख्याती असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, देवस्थान समितीसह भक्तगण जत्रा साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जत्रा सुरळीतपणे साजरी व्हावी, यासाठी पोलिस आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.

lairai devi Jatrotsav
Lairai Jatrotsav: ‘धोंड’ तळीवर भाविकांची गर्दी! लईराईच्या दर्शनासाठी गजबजाट; शनिवारपासून 4 दिवस कौलोत्सव

भाविकांची उत्सुकता शिगेला

देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेली श्री लईराई देवीची जत्रा साजरी करण्यासाठी देवस्थान समिती सज्ज झाली आहे. धोंड भक्तगणांसह प्रत्येक भाविकाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. शिरगाव परिसर सध्या भक्ती आणि मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच भक्तगणांची गर्दी होऊ लागते. वाहने घेऊन येणाऱ्या भक्तांनी आरक्षित केलेल्या जागेत वाहने पार्किंग करून सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानचे सचिव भास्कर गावकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com