वास्कोत 22 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या, श्री दामोदर भजनी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त वास्कोचे आमदार कृष्णा साळकर आणि पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. 124 हा भजनी सप्ताह आहे.
यंदा श्री दामोदर भजनी सप्ताहात स्वतंत्र पथ मार्गावरील फेरी फक्त सात दिवसच ठेवण्यात येईल. तसेच बैठकीत सप्ताहातील लाकडी फेरी विषयी अंतिम निर्णय होऊ शकला नाही. पुढील आठवड्यात लाकडी फेरी कुठे लावायची याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दिली.
बैठकीला आमदार कृष्णा साळकर, मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, मुरगाव तालुक्याचे उप जिल्हाधिकारी भगवंत करमली, पोलिस उपअधीक्षक शेख सलीम व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. वास्को बायणा येथील रविंद भवन मध्ये बैठक पार पडली.
सप्ताह काळात अतिरिक्त पोलिस दल व आयआरबी पथक तैनात करण्यात येईल. वाहतुक व्यवस्था तानिया हॉटेलच्या जागेत दुचाकी वाहने तर चारचाकी वाहने बेलाबाय सागच्या खुल्या जागेत व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती वाहतुक पोलिस निरीक्षक नार्वेकर यांनी दिली.
सप्ताह काळात तीन रुग्णवाहीका तैनात करण्यात येतील अशी माहिती आमदार साळकर यांनी यावेळी दिली. सप्ताह फेरीत गोबी मंच्युरीयन गाडी लावण्याबाबतचा विषय अन्न व औषध प्रशासन व मुरगाव पालिका संयुक्त रित्या बैठक घेऊन सोडविणार, अशी माहिती साळकर यांनी दिली.
सप्ताहात भरणारी लाकडी फेरी विषयी निर्णय अजुनही प्रलंबित आहे. यामुळे लाकडी फेरी यंदा कोणत्या ठिकाणी उभारणार, हा विषय जैसे थे राहिला. नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी लाकडी फेरी भरविणाऱ्या समवेत बैठक घेऊन हा विषय सोडविणार अशी माहिती दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.