Banastarim Bridge Accident: विचारपूस! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बाणस्तारी अपघातातील जखमींची घेतली भेट

अपघातातील जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Banastarim Bridge Accident | CM visit GMC
Banastarim Bridge Accident | CM visit GMCDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी येथे रविवारी झालेल्या अपघातात तीन जणांचा बळी गेला तर तीनजण गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरूवारी विधानसभेचे अधिवेशन उरकल्यानंतर आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अपघातातील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

बाणस्तारी येथील अपघातात वनिता भंडारी (रा. फोंडा), राज माजगावकर आणि ज्येष्ठ नागरिक शंकर हळर्णकर हे तीनजण जखमी झाले.

वनिता भंडारी (फोंडा) यांना श्वासोच्छवासाची समस्या उदभवल्याने त्यांना सुपर स्पेशालिटीच्या आयसीयूमध्ये स्थलांतरित केले आहे. शंकर हळर्णकर हे ज्येष्ठ नागरिक असून अपघातानंतर ते आपल्या चारचाकी वाहनातच अडकून पडले होते. त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा एक हात आणि पाय निष्क्रिय झाला आहे.

तर, राज माजगावकर हा तरुण सुखरूप असून डोक्याला दुखापत झाल्याने त्याला १३८ क्रमांकाच्या विभागात ठेवले आहे.

Banastarim Bridge Accident | CM visit GMC
I-League Football: आय-लीग फुटबॉलमधील चुरस वाढली; इंटर काशी, नामधारी एफसीला ‘कॉर्पोरेट’ प्रवेश

बाणस्तारी येथील अपघातात मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. मृत्यू झालेल्यांची कुटुंबे तर पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत, तर जखमींच्या कुटुंबीयांची परिस्थितीही फारशी चांगली नाही.

जखमींवर अजूनही उपचार सुरू असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com