Notice
NoticeDainik Gomantak

Goa Panchayat|शेळडे पंचायत सचिवांना कारणे दाखवा नोटीस

आयुक्त संजय ढवळीकर यांनी केपे तालुक्यातील शेळडे पंचायतीचे सचिव रवींद्र वाडीकर यांच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
Published on

मडगाव : माहिती हक्क कायद्यांतर्गत मागितलेली माहिती दडवून ठेवल्याचा ठपका ठेवत राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर यांनी केपे तालुक्यातील शेळडे पंचायतीचे सचिव रवींद्र वाडीकर यांच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

(Show cause notice to Shelde Panchayat Secretary in goa)

Notice
Goa: पारदर्शक कारभारासाठी आता डिजिटल पद्धत अत्यावश्‍यक!

तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण देण्यात यावे, असेही त्यात म्हटले आहे. या प्रकरणी आता ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सोनफातर- शेळडे येथील अनिल सावंत देसाई यांनी वाडीकर यांच्याविरोधात माहिती आयुक्त कार्यालयात ही याचीका दाखल केली होती. सोनफातर येथील हाउसिंग बोर्ड खुल्या जागेत स्थानिक पंचायतीकडून व्हालीबॉल मैदान बांधले जात होते. या मैदानाला हाउसिंग बोर्डमधील राहिवाशांनी विरोध केला होता. या प्रकरणी सावंत देसाई यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात पंचायतीकडून माहीती हक्क कायद्याखाली माहिती मागितली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com