Panjim Municipality: माहिती देण्यास जाणीवपूर्वक विलंब करणे भोवले; पणजी महापालिकेच्या माहिती अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

अर्जदाराला 7,792 रु. भरपाई द्या : महापालिकेला आदेश
Goa Panaji Municipality
Goa Panaji MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Municipality: कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती अर्जदाराला देण्यात जाणीवपूर्वक विलंब केल्याप्रकरणी गोवा राज्य माहिती आयोगाने पणजी महानगरपालिकेच्या सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यावर (पीआयओ) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच अर्जदाराला 7,792 रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही महापालिकेला दिला आहे.

Goa Panaji Municipality
Goa Police: आयपीएस डॉ. कोन यांना अखेर पदावरून हटवले!

राज्य माहिती आयुक्त संजय ना. ढवळीकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका निकालात, अर्जदाराने मागितलेली माहिती उपलब्ध असतानाही ठरावीक मुदतीत का दिली नाही याचा खुलासा करण्याचा आदेश महापालिकेचे ‘पीआयओ’ सिद्धेश बी. नाईक यांना दिला आहे. मागे अशाच एका प्रकरणात आयोगाने या ‘पीआयओ’ला माहिती हक्क कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्याचा इशारा दिला होता.

तरीही नागरिकांना माहितीसाठी ताटकळत ठेवून अपील करण्यास भाग पाडण्याची कार्यपद्धती ‘पीआयओ’ नाईक यांनी कायम ठेवली. हे गैरवर्तन कायद्याचे पालन करणारे नसल्यामुळे त्याच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावणे आवश्यक ठरते, असे संजय ढवळीकर यांनी आपल्या निवाड्यात म्हटले आहे.

राज्‍य माहिती आयुक्‍तांची कारवाई

... म्‍हणून कारवाईचा बडगा

माहिती हक्क कायद्याच्या कलम 7(1) अंतर्गत 30 दिवसांत माहिती देणे बंधनकारक असतानाही ‘पीआयओ’ सिद्धेश बी. नाईक यांनी या मुदतीत अर्जदाराला साधे उत्तरही दिले नाही.

Goa Panaji Municipality
World Tribal Day: आदिवासींवर आजही अन्याय, मणिपूर घटनेतूनही झाले सिद्ध; समाजाने संघटित होण्याची गरज

त्यामुळे अर्जदार निहार मिलिंद बर्वे यांनी प्रथम अपील अधिकाऱ्यासमोर (एफएए) अपील केले. महापालिका आयुक्त आणि एफएए क्लेन मदेरा यांनी माहिती देण्याचा आदेश जारी केल्यानंतर ‘पीआयओ’ने अर्जदाराला माहिती पुरवली.

पीआयओने उपलब्ध असलेली माहिती द्यायला केलेल्या हेतुपूर्वक विलंबामुळे आपल्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी याचना अर्जदाराने केली होती. ही याचना मान्य करून महापालिकेने 7,792 रुपयांची भरपाई अर्जदाराला द्यावी, असे संजय ढवळीकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com