सासष्टी: चतुर्थीच्या ऐनवेळी प्रवाशांची गर्दी होत असताना कदंब महामंडळाच्या बसेसची कमतरता जाणवत आहे. मडगावसारख्या शहरातून आपल्या गावात जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असते.
शिवाय महाराष्ट्र, कर्नाटक येथील शेजारील राज्यांमध्येही आपल्या घरी जाण्यास लोक उत्सुक असतात. मात्र, कदंब बसेस प्रवाशांच्या गर्दीचा सामना करण्यास अपयशी ठरत आहेत. शुक्रवारी व शनिवारी मडगावच्या कदंब बसस्थानकावर बसेसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची अलोट गर्दी होती.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या कदंब महामंडळाने शेजारील राज्यात जाणाऱ्या बसेस कमी केल्या आहेत. गोव्यात १९०० बसेस सुरू आहेत. त्यातील १४०० खासगी व अंदाजे ५०० कदंब महामंडळाच्या बसेसचा समावेश होतो.
एका सल्लागाराने दिलेल्या अहवालानुसार गोव्याला दैनंदिन प्रवासासाठी २५०० बसेसची आवश्यकता आहे. हा अहवाल २०२१चा आहे. तीन वर्षांत २०० ते ३०० बसेसची भर पडली असावी, असा अंदाज आहे.
कदंबने ‘म्हजी बस’ योजना सुरू केली असली तरी या योजनेला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. गोव्यात प्रवासी वाहतुकीत सुधारणा आणण्याची अत्यंत गरज असल्याचे मत ‘गोवा कॅन’चे निमंत्रक रोलांड मार्टिन्स यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.