Kadamba Bus: बस उशिरा का सोडली? ‘कदंब’कडून उद्धट उत्तरे

Kadamba Bus Timing Dispute: गेल्या काही दिवसांपासून पणजी ते वास्को जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत
Kadamba Bus Timing Dispute: गेल्या काही दिवसांपासून पणजी ते वास्को जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत
Kadamba BusDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्को - मुरगाववासीयांवर राज्य कदंब मंडळाचा नेहमीच अन्याय होतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण सोमवार व मंगळवारी पणजी कदंब बस स्थानकावर सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास पाहायला मिळते. बस उशिरा का सोडली, असे विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे डेपो व्यवस्थापकांकडून प्रवाशांना ऐकावी लागतात.

पणजी ते मडगाव दहा मिनिटांत दोन बसेस प्रवाशांना घेऊन जातात. तर अर्ध्या तासाने एक बस वास्कोला जाते, तीही तुडूंब भरलेल्या अवस्थेत सोडण्यात येते. एकप्रकारे ‘कदंब’कडून वास्कोवासीयांचा छळ होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Kadamba Bus Timing Dispute: गेल्या काही दिवसांपासून पणजी ते वास्को जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत
Kadamba Bus : ‘कदंब’ बससेवा कोलमडली; महामंडळाने लक्ष द्यावे

राज्य कदंब मंडळातर्फे सर्व सामान्यांसाठी प्रत्येक तालुक्यातील गावामध्ये बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून पणजी ते वास्को बस सेवा सायंकाळच्या सत्रात, खास करून वास्कोला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

कामावरून येणाऱ्या बरोबर नियमित पणजीत कामाला जाणाऱ्यांना सायंकाळी वास्कोची बस उपलब्ध होत नसल्याने ताटकळत उभे राहावे लागते, असे काही प्रवाशांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Taxi Driver Attack Goa
Beard Growth
Kadamba Bus Drivers Recruitment
Kadamba Interstate Bus Service
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com