
Police investigate suspicious death of married woman in Bicholim
डिचोली: विष प्राशन केलेल्या डिचोलीतील एका विवाहित महिलेचा अखेर उपचारावेळी मृत्यू झाला असून, तिच्या मृत्यूप्रकरणी गूढ निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मयत विवाहितेच्या लग्नाला सात वर्षे झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मृत्यूप्रकरणाची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. कातरवाडा-धबधबा परिसरात राहणाऱ्या या विवाहितेने दोन दिवसांपूर्वी कीटकनाशक प्राशन केले होते. तिच्यावर बांबोळी येथील ‘गोमेकॉ’त उपचार चालू होते.
उपचार चालू असताना काल (सोमवारी) रात्री तिला मृत्यूने गाठले. दरम्यान, विवाहितेच्या पार्थिवावर आज सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
चौकशीनंतरच या मृत्यू प्रकरणामागील सत्य समोर येण्याची शक्यता आहे. मयत विवाहितेला तीन आणि दीड वर्षांची मिळून दोन मुलं आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
या विवाहितेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली असली, तरी शहरात अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. त्यामुळे या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी गूढ वाढले आहे. नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने किंवा सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा सध्या चालू आहे. तर या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सदर विवाहिता शहरातील एका आस्थापनात कामाला होती. सदर आस्थापनात केलेली चोरी उघड झाली होती. हे प्रकरण मिटवण्यातही आले होते. मात्र, या प्रकरणानंतर लोकलज्जेला घाबरून तिने जीवनाचा शेवट करण्याचा अविचारी निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.