भाडे पट्टीत वाढ केल्याने मुरगाव येथील गाळेधारकांचा निषेध

मुरगाव नगरपालिकेने मार्केटमधील गाळेधारकांची भाडे पट्टीत वाढ केल्याने सोमवारी संडे मॉडन गाळेधारकांनी दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला.
मुरगाव नगरपालिकेने गाळेधारकांच्या भाडे पट्टीत वाढ केल्याने पालिका इमारती समोर जमलेले गाळेधारक.
मुरगाव नगरपालिकेने गाळेधारकांच्या भाडे पट्टीत वाढ केल्याने पालिका इमारती समोर जमलेले गाळेधारक.Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता आर्थिक रित्या कुमकुवत झाली असताना, मुरगाव नगरपालिकेने मार्केटमधील गाळेधारकांची भाडे पट्टीत वाढ केल्याने सोमवारी संडे मॉडन गाळेधारकांनी दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला. वाढ सर्व नियम पाळून केल्याने माघार घेणे अशक्य असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी जयंती तारी व नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितल्याने गाळेधारकांना हिरमुसले होऊन माघार घ्यावी लागली.

(Shop owners express discontent over inflated shop rents)

मुरगाव नगरपालिकेने गाळेधारकांच्या भाडे पट्टीत वाढ केल्याने पालिका इमारती समोर जमलेले गाळेधारक.
जनतेचे प्रश्‍‍न आक्रमकपणे मांडणार : मायकल लोबो
Goa
Goa Dainik Gomantak

मुरगाव नगरपालिकेने गेल्या आठवड्यात गाळेधारकांच्या सोपो भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. गेल्या दहा वर्षात राज्यातील एकमेव नगरपालिका मुरगाव पालिकेने गाळेधारकांच्या भाडे पट्टीत वाढ केली नाही. मात्र इतर सर्व नगरपालिका (Municipality) गाळेधारकांना भाडे पट्टीत दुपटीने वाढ केली आहे. वास्को येथील मुरगाव नगरपालिकेने गेल्या आठवड्यात पालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व गाळेधारकांच्या भाडे पट्टीत पूर्वी पेक्षा दुपटीने वाढ केल्याने गाळेधारकांनी नाराजी व्यक्त करून येथील मॉडन मार्केटमधील गाळेधारकांनी आपली दुकाने सोमवारी (दि.४) बंद ठेवली. गेली दहा वर्षे प्रति 1 चौ. मी. जागेचे भाडे फक्त 5 रुपये होते. ते आता वाढवून 15 रुपये प्रति चौ. मी. केल्याने गाळेधारकांनी आपली दुकाने बंद करून मुरगाव नगरपालिके समोर येऊन निषेध व्यक्त केला.

दरम्यान मुरगाव नगरपालिकेने गाळेधारकांच्या भाडे पट्टीत वाढ केल्याने मॉडन मार्केट पूर्णपणे बंद करून गाळेधारकांनी पालिकेच्या विरोधात निषेध व्यक्त केला व याचा पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना जाब विचारला. तसेच भाडे पट्टीत वाढ करू नये अशी मागणी केली. मात्र मुरगाव (Murmugoa) नगरपालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. यावर गाळेधारकांना हिरमुसले होऊन माघारी परतावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com