Sadetod Nayak : धक्कादायक! २५ वर्षांखालील युवतीही बनताहेत हृदयरोगी

बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर घातक परिणाम : डॉ. ज्योती कुस्नुर
DR  JYOTI KUSNUR
DR JYOTI KUSNUR Dainik Gomantak
Published on
Updated on

Sadetod Nayak : तरुणांना हृदयविकाराचे झटके ही मोठी चिंतेची बाब आहे. आता गोव्यातील 24-25 वर्षांखालील युवतींनाही हृदयविकाराचे झटके येऊ लागले असून, त्या उपचारांसाठी रुग्णालयात धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

हा आजार वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी त्यावर उपचार करणे आणि आचरणात बदल करणे आवश्‍यक असल्याचे मत प्रसिद्ध कार्डियालॉजिस्ट डॉ. ज्योती कुस्नुर यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आदल्या दिवशी गोमन्तक टीव्हीवर संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या मुलाखतीत डॉ. कुस्नुर यांनी वरील मत व्यक्त केले.

DR  JYOTI KUSNUR
Goa Tourism : पर्यटन क्षेत्राची घडी पूर्ववत!

महिलांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. वाढलेले वजन, एकाच जाग्यावर बसून राहणे, रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे, मोबाईलवर राहणे या प्रकारांचा हृदयावर परिणाम होतो. प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिला हृदयविकाराचा झटका येऊन गेला. परंतु तिने तत्काळ उपचार केल्यामुळे व योग्य उपचारपद्धती मिळाल्याने ती दोन दिवसांत घरी जाऊ शकली, असे डॉ. कुस्नुर म्हणाल्या.

डॉ. कुस्नुर सांगतात, युवकांना वाटते की आपल्याला काहीच होत नाही. परंतु जेव्हा तुम्ही चालायला लागता तेव्हा छातीत ॲसिडिटीसारखा त्रास, खांदे दुखणे, हाताच्या कोपऱ्याचे सांधे दुखणे, डावा हात दुखणे काही लोकांमध्ये जबडा दुखणे ही सर्व हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.

हार्ट ब्लॉक असल्यास तुम्ही योग्य वेळी उपचार घेतल्यास त्यातून बरे होऊ शकता. मधुमेह झाल्यानंतर पाच ते सहा वर्षांनंतर त्याचा परिणाम हृदयावर होतो. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे मधुमेहाची लक्षणे वेगळी आणि हृदयविकाराची लक्षणे वेगळी असतात, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

30 वर्षांच्या मागे वळून पाहिले तर मुले सर्वत्र खेळताना दिसत होती. आता तशी मुले दिसत नाहीत; कारण प्रत्येकजण मोबाईलवर, लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर उशिरापर्यंत बसतात. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा आल्याचे दिसते. त्यासाठी मोबाईलचा, टीव्हीचा आणि लॅपटॉपचा वापर सीमीत ठेवला पाहिजे. मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे.

DR  JYOTI KUSNUR
Women’s Day 2023 : गरिबीतही संसाराचा गाडा ओढणारी दीपाली परवार

कार्डियालॉजिस्ट काय म्हणतात?

शरीराला योग्य तो व्यायाम मिळणे गरजेचे. गोव्यात महिलांत दारू पिण्याचे वाढते प्रमाण. मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामुळे हृदयावर ताण. ॲसिडीटीचा सतत होणारा त्रास. महिलांमध्ये आजारांविषयीची जागृती आवश्‍यक. अभ्यासक्रमातही अशा विकारांविषयी समावेश गरजेचा. पोषक आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक वापर हवा. जंकफूड, कोलेस्ट्रॉल वाढविणारे पदार्थ खाणे टाळावेत

"छातीत दुखू लागले तर वेळ न दवडता रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. मागील काही वर्षांपूर्वी हृदयावर उपचारपद्धतीत 100 रुग्ण असले तर त्यातील 60 टक्के लोकांचा त्यात मृत्यू होत होता."

"आता 2023 चा जर विचार केला आणि हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याचे 100 लोक कार्डियाक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. 99 टक्के लोक हृदयविकारावरील सध्याच्या उपचारांमुळे बरे होतात."

- डॉ. ज्योती कुस्नुर, कार्डियालॉजिस्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com