Shocking : विर्डी येथे बारा वर्षीय मुलासह दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

मृत नात्याने मावसा आणि पुतण्या
Death
DeathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shocking : विर्डी-साखळी येथील वाळवंटी नदीत आंघोळ करताना बारा वर्षीय मुलासह दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) दुपारी घडली. स्पर्श संजय नाईक (वय 12, रा. कुंडई) आणि राजेंद्र कृष्णा कुडाळकर (वय 57, रा. बांदोडा) अशी मृतांची नावे आहेत.

दोघेही दुपारी नदीवर आंघोळीसाठी गेले असता, क्रूर काळाने त्यांच्यावर झडप घातली. दोघेही मृत नात्याने मावसा आणि पुतण्या होते, अशी माहिती मिळाली.

Death
Water Sports In Goa : मंत्री-आमदारांत सुंदोपसुंदी; राज्यातील जलक्रीडांवर संक्रांत

राजेंद्र कुडाळकर आणि त्यांचा पुतण्या (मेहुणीचा मुलगा) स्पर्श नाईक हे दोघेही दुपारी विर्डी गावातील महादेव मंदिराजवळ वाळवंटी नदीत आंघोळीसाठी गेले होते. संध्याकाळ झाली तरी ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांसह गावातील लोकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी दोघांचेही मृतदेह वाळवंटी नदीत तरंगताना आढळले.

राजेंद्र कुडाळकर हे विर्डी गावचे जावई असून ते विर्डीतच राहात होते. स्पर्श हा राजेंद्र यांच्या मेहुणीचा मुलगा होता. सध्या मेहुणीची प्रकृती ठिक नसल्याने तो गेले दोन महिने विर्डी येथे मावशाकडेच राहायला आला होता. संध्याकाळी हा प्रकार उघडकीस येताच, डिचोली पोलिसांना माहिती देण्यात आली.

Death
School Admission : प्रवेश शुल्काच्या नावाखाली प्रचंड लूट; पालक हतबल

पोलिस निरीक्षक सूरज गावस, उपनिरीक्षक अनिल पोळेकर आणि सहकारी घटनास्थळी दखल झाले. स्थानिकांच्या सहकार्याने संध्याकाळी उशिरा दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

GIM Student Attack
Kapileshwari Kavale Pond Fish Death
Sporting Club Goa Charity Cup
Satorli Gavdongari Accident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com