धक्कादायक! दरोडेखोराने 300 रुपयांसाठी अज्ञाताचा चिरला गळा

याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे.
Delhi Crime
Delhi CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Crime: दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात मास्क घालून आलेल्या एक दरोडेखोराने जोडप्याला चाकू दाखवून पैसे मागितले आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे.

डीसीपी प्रशांत गौतम यांनी सांगितले की, ही घटना 16 फेब्रुवारीच्या रात्री घडली. परंतु पोलिसांना 17 फेब्रुवारी रोजी या घटनेची माहिती मिळाली. ते म्हणाले की, गुरुवारी डीडीयू हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले की मायापुरी भागातील रहिवासी रामकिशोर उर्फ ​​किशोर कुमार याला त्याच्या भावाने बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आल्यानंतर त्याचवेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. (Shocking The robber strangled an unknown person for 300 rupees)

Delhi Crime
गोवा: CM पदासाठी इच्छुकांची 'फिल्डिंग', बंद दाराआड चर्चांचं सत्र

माहिती मिळताच मृताच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, ती पती रामकिशोरसोबत पार्कमध्ये फिरत होती, तेव्हा एक व्यक्ती मास्क घालून आला आणि चाकू दाखवून 300 रुपयांची मागणी केली, मात्र पतीने याला विरोध केला. दरम्यान, नराधमाने पतीवर चाकूने हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला.

अतिरिक्त डीसीपींच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पती-पत्नी दोघेही अनेकदा उद्यानात बसायचे. दरम्यान, बुधवारी दरोडेखोराला विरोध केल्याच्या कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. यावेळी आरोपीने महिलेसोबत गैरवर्तनही केले. घटनेच्या अवघ्या 2 तासांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. राजदास असे आरोपीचे नाव असून तो आसामचा रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दिल्लीत भटकत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com