गोवा: CM पदासाठी इच्छुकांची 'फिल्डिंग', बंद दाराआड चर्चांचं सत्र

गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा पार करता येणार नाही, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे भाकीत आहे.
Digambar Kamat, Pramod Sawant and Michael Lobo
Digambar Kamat, Pramod Sawant and Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान 14 फेब्रुवारीला पार पडले. सध्या सर्वच राजकीय पक्ष एकहाती सत्ता स्थापनेचा दावा करत असले, तरी मतदारांनी कुणाला पसंती दिली आहे याचा खुलासा 10 मार्च रोजीच होणार आहे.

Digambar Kamat, Pramod Sawant and Michael Lobo
कलिंगडाच्या शेतीतून मोठ्या नफ्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

40 मंतदारसंघांच्या गोवा विधानसभेच्या या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा पार करता येणार नाही, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे भाकीत आहे. असे असले तरी प्रत्येक पक्षातील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नेते पक्षातील नेत्यांबरोबर संपर्कात आहेत. याचबरोबर अनेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवारांबरोबर देखील संपर्क वाढवला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मुख्यमंत्री होण्यासाठी अनेक नेत्यांनी माझा पाठिंबा मागितला आहे. मात्र मी सर्वांना नकार दिला आहे. पुढील मुख्यमंत्र्यावर कोणतेही गुन्हेगारी किंवा भ्रष्टाचाराचे आरोप नसावेत, असे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे सुदिन ढवळीकर म्हणाले.

भाजपच्या एका विद्यमान आमदाराने सांगितले की, "पक्षाने साखळीचे उमेदवार आणि सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला असताना देखील भाजपमध्येही गटबाजी सुरू झाली आहे". आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचेही नाव या मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

Digambar Kamat, Pramod Sawant and Michael Lobo
मडगाव - कारवार रेल्वेमार्ग विद्युतीकरणाला ग्रीन सिग्नल

काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि माजी मंत्री मायकल लोबो हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. लोबो यांनी मंत्रीपद आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

डिचोलीतील अपक्ष उमेदवार चंद्रकांत शेट्ये म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधून पाठिंबा मागितला आहे. विशेष म्हणजे काही नेत्यांनी मतमोजणीच्या दिवसापूर्वी आपल्या नावावर मुख्यमंत्री पदाचा शिक्का मारून घेण्यासाठी दिल्लीला जाण्याची योजना आखली आहे.

2017 मध्ये भाजपला (BJP) 13 तर काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. मात्र, छोट्या पक्षांना एकत्र करून भाजपने 5 वर्षे सरकार चालवले. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी पुढील सरकार स्थापनेसाठी बहुमत मिळवण्याचा दावा केला आहे. पण अखेर या सर्व गोष्टी जनतेच्याच हातात असून निकालानंतरच त्या स्पष्ट होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com