Pernem Crime: धक्कादायक! नेदरलँडच्या पर्यटक युवतीवर बलात्काराचा प्रयत्न; मोरजी येथील प्रकार

संशयित परप्रांतीय हॉटेल कामगारास पोलिसांनी केली अटक
Pernem crime
Pernem crimeDainik Gomantak

Pernem Crime: परदेशी पर्यटकांवर हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका परदेशी पर्यटक युवतीवर बलात्काराच प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोरजी येथील एका रिसॉर्टमध्ये ही घटना घडली असून या रिसॉर्टमध्येच काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराने हा प्रकार केला आहे. पोलिसांनी संबंधित कामगाराला अटक केली आहे.

Pernem crime
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचा 'ड्रोन व्ह्युव'; पाहा व्हिडिओ...

संशयित कामगाराचे नाव अभिषेक वर्मा (वय २७) असे असून तो मूळचा देहरादून (उत्तराखंड) येथील आहे. अभिषेक वर्मा असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. तर संबंधित पर्यटक युवती ही मूळची नेदरलँडची आहे.

पोलिसांकडे २९ मार्च रोजी संबंधित युवतीने तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, २९ मार्च रोजी दुपारी मोरजी येथील वेल विंग ह्या बीच रिसोर्ट मधील दोनच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील अज्ञात पुरूषाने या युवतीने भाड्याने घेतलेल्या टेंटमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. युवतीने त्याला पाहताच आरडाओरडा केला.

त्यानंरत आरोपीने तिला पकडून धमकावले. संबंधित मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून एक स्थानिक व्यक्ती युरेका डायस तिथे आला. त्याला पाहून संशयित आरोपी पळून गेला. थोड्या वेळाने आरोपी चाकू घेऊन परत आला. आणि बचावासाठी आलेल्या युरेका डायसवर त्याने चाकूने हल्ला केला.

चाकुने वार करून आरोपी पुन्हा पळून गेला. यात युरेका डायससह युवती जखमी झाली आहे. त्यानंतर तक्रारदार युवती आणि युरेका डायसला उपचारासाठी बांबोळी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Pernem crime
Bardez and Pernem: बार्देश, पेडणे तालुक्यात 'या' दिवशी नसणार वीज

पेडणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत, पीएसआय विवेक हळर्णकर, पीएसआय हरीश वायंगणकर, तीर्थराज म्हामल, कॉन्स्टेबल कृष्ण वेळीप, सागर खोर्जुवेकर, प्रेमनाथ स्वलदेसाई, रजत गावडे यांनी शिताफीने आरोपीला अटक केली.

या प्रकरणाचा तपास पेडणेचे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत आणि एसडीपीओ राजेश कुमार यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com