Xeldem: 2 गटांमधील वादात पोलिसाला मारहाण, शिवनगर-शेल्डे येथील दंगेखोरांविरुद्ध तक्रारी; दोघांना अटक

Xeldem Quepem Crime News: पोलिसाला मारहाण करणाऱ्या संशयिताचे नाव जॉयसन फर्नांडिस असे असून तो काकोडा-कुडचडे येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: शिवनगर-शेल्डे (केपे) येथे बुधवारी रात्री उशिरा दोन गटांमध्ये सुरू झालेला वाद सोडवण्यास गेलेल्या एका पोलिसालाच मारहाण होण्याची घटना घडल्याने तो सध्या या भागात चर्चेचा विषय बनला असून त्यानंतर हे सर्व तरुण पळून गेले.

केपे पोलिसांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले असून रात्री उशिरा दोघांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची नावे बहुदीप प्रभुदेसाई आणि समीर मंकवी अशी असून ते दोघेही काकोडा येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसाला मारहाण करणाऱ्या संशयिताचे नाव जॉयसन फर्नांडिस असे असून तो काकोडा-कुडचडे येथील असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, संशयित अद्याप गायब आहे. या प्रकारामुळे रात्री उशिरापर्यंत खुली असणारी दुकाने आणि तिथे होणाऱ्या गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणात केपे पोलिसांत जॉयसन फर्नांडिस आणि अन्य पाच जणांवर दोन वेगवेगळ्या तक्रारींत गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. ज्या ठिकाणी ही मारामारी झाली, तिथे असलेले फास्टफूड सेंटर पहाटेपर्यंत खुले असते. जॉयसन आणि त्याचे अन्य चार-पाच मित्र तेथे जेवायला बसले होते.

त्यावेळी शेल्डे येथे रहाणारा ब्रायन कॉस्ता हा युवक फेलिक्स फर्नांडिस या मित्रासह आईस्क्रीम विकत घेण्यासाठी आला असता, जॉयसन आणि त्याच्या मित्रांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढल्यावर कुणीतरी १०० क्रमांक डायल करून पोलिसांना बोलावून घेतले.

Goa Crime News
Goa Crime: गोव्यात मटका अड्ड्यांविरुद्ध मोठी कारवाई, विविध ठिकाणी 12 बुकींना अटक; रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त

काय झाले ते पाहण्यासाठी केपेचे साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावकर हे तेथे पोहोचले असता, जॉयसनने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे वाहनचालक असलेले कॉन्स्टेबल रोहन नार्वेकर हे त्यांच्या मदतीला धावून आले असता जॉयसनने त्यांच्या थोबाडीत मारली.

यावेळी त्या ठिकाणी दोनच पोलिस आणि दंगेखोर युवकांचा गट मोठा असल्याने आणखी पोलिस कुमक पाठविण्यासाठी फोन करण्यात आला. मात्र, तीच संधी साधत त्या युवकांनी कारमधून तिथून पळ काढला.

Crime News
Crime NewsDainik Gomantak

दोन गुन्हे दाखल

दुसरी तक्रार ब्रायन कॉस्ता यांनी दिली असून यात जॉयसन फर्नांडिस व इतर सहाजणांनी मिळून आपल्यावर आणि आपला मित्र फेलिक्स फर्नांडिस याच्यावर बेकायदा जमावाने विनाकारण हल्ला केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी केपे पोलिस पुढील तपास करीत आहे. या प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले असून उपनिरीक्षक जॉयसी कार्व्हालो आणि उपनिरीक्षक सिद्धेश नाईक हे तपास करीत आहेत.

Goa Crime News
Goa Crime: दिल्लीतील तरुणीशी मैत्री करुन लैंगिक शोषण, वास्कोतील आरोपीला कोर्टाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा

सरकारी सेवेत व्यत्यय

सध्या या प्रकरणात त्या दंगेखोर युवकांविरोधात दोन तक्रारी दाखल केल्या असून पहिली तक्रार साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावकर यांनी दिली असून त्यात पोलिसांना मारहाण करणे आणि अधिकृत सेवा बजावताना व्यत्यय आणल्याचे म्हटले आहे. सेवा बजावत असताना शिवीगाळ करणे, तसेच पोलिसाला मारहाण करणे, असे नमूद करीत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com