Chandrakant Bandekar Case: शिवसेनेची पेडणे पोलीस स्टेशनवर धडक

या घटनेला महिना उलटण्याच्या मार्गावर आहे, मात्र अजून पर्यंत पोलिसांनी संशयीतांना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पेडणे पोलीस स्टेशनवर 29 रोजी धडक दिली आहे.
Shiv Sena hit Pernem police station in Chandrakant Bandekar murder case
Shiv Sena hit Pernem police station in Chandrakant Bandekar murder caseDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: सक्राळ तोरसे येथील रेती व्यवसाईक चंद्रकांत बांदेकर यांचा 2 जुलै रोजी दिवसाढवळ्या खून (Murder Case) करण्यात आला होता जवळ जवळ या घटनेला महिना उलटण्याच्या मार्गावर आहे, मात्र अजून पर्यंत पोलिसांनी (Police) संशयीतांना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पेडणे पोलीस स्टेशनवर (Police station) 29 रोजी धडक देवून पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांची भेट घेवून संशयीतांना त्वरित अटक करून बांदेकर कुटुंबियाना न्याय द्यावा अशी मागणी केली .

Shiv Sena hit Pernem police station in Chandrakant Bandekar murder case
Goa: वन्‍यजीव रक्षणासाठी संघटित प्रयत्नांची गरज

शिवसेनेने 29 रोजी पेडणे पोलीस स्टेशनवर धडक दिली त्यावेळी शिवसेना उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, शिवसेना महिला नेत्या ऐश्वर्या साळगावकर, राजाराम पाटील, सुशांत पावसकर, दिवाकर जाधव, विलास मलिक, राजन पार्सेकर दीपक येरम, कृष्णा कोरगावकर समित पवार, संजय पवार मेहबूब नालेबन आदी उपस्थित होते .

यावेळी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी माहिती देताना तपास चालू आहे, संशीताना लवकरच पकडले जाईल मुख्य संशीताचे रेखाचित्र प्रसारित केले आहे, रेती व्यवसायाशी संबधित मजूर 2 तारखेला येणार आहे त्यानंतर तपासाला गती मिळेल, बांदेकर कुटुंबियांचा पोलिसावर पूर्ण विश्वास आहे. तपासाला गती दिली जात आहे, मागचे पंधरादिवस जिल्हा पोलीस अधिकारीही उपस्थित राहून अधून मधून मार्गदर्शन करत असतात असे सांगितले.

Shiv Sena hit Pernem police station in Chandrakant Bandekar murder case
Goa: म्हादईचे किती पाणी कर्नाटकने पळविले?

शिवसेनेचे उपाध्यक्ष सुभाष केरकर यांनी बोलताना आम्ही बांदेकर कुटुंबियाना अधून मधून मिळत असतो , त्यांचीही मागणी असते कि आम्हाला न्याय मिळवून द्यावा म्हणून, त्याच पाश्वभूमीवर शिवसेनेने पोलीस निरीक्षक दळवी यांची भेट घेवून चर्चा आणि अटक करण्याची मागणी केली आहे असे सांगितले. पोलीस निरीक्षकाने त्वरित न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Shiv Sena hit Pernem police station in Chandrakant Bandekar murder case
Goa: वाघ वाचले तरच मिळेल पिण्‍याचे पाणी

पोलीस तपास खूप धीम्या गतीने चालू आहे. पिडीतीना अजून न्याय मिळत नाही. त्याला आता गती द्यावी अशी मागणी केली . उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या मतदार संघात दिवसा ढवळ्या नागरिकाचा खून होतो, त्या विषई आमदार या नात्याने त्यांनी कोणता पाठपुरावा केला असा सवाल सुभाष केरकर यांनी उपस्थित केला, जर बांदेकर कुटुंबियाना न्याय मिळाला नाही तर शिवसेना रस्त्यावर येवून आंदोलन करणार असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com