Goa: वन्‍यजीव रक्षणासाठी संघटित प्रयत्नांची गरज

Goa: वन्‍यप्राण्‍यांचे (Wild Animals) संवर्धन आणि संरक्षण यासाठी विविध राज्यांच्या वनखात्याने (Forest Department) संयुक्त प्रयत्न केले पाहिजेत.
Goa: Bangal Tiger
Goa: Bangal TigerDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : जंगली प्राण्यांना मानवनिर्मित बॉर्डर (सीमा) माहिती नसतात, पण ते उत्तम व्यवस्थापक असतात. त्यामुळे नैसर्गिक गरजा आणि गुणधर्मानुसार निसर्गात त्यांचा संचार असतो. आपण म्हणतो तो वाघ, हत्ती, गवे त्या राज्यातून आले किंवा आपल्या काही प्राण्यांनी स्थलांतर केले, पण त्यांना या सीमा माहितच नसतात. त्याशिवाय त्यांच्यावर आपण ते आपले म्हणून टॅग करू शकत नाही. त्यामुळे जंगल कॉरिडॉरचा विचार करून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी विविध राज्यांच्या वनखात्याने संयुक्त प्रयत्न केले पाहिजेत, असे मत वनाधिकारी परेश परोब यांनी व्यक्त केले आहे. राज्यात वाघांच्या (Tiger in Goa) अस्तित्वाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह होते. मात्र, यापूर्वी वनखात्याने विविध ठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये अनेकवेळेला वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. मागे झालेल्या चार वाघांच्या हत्येनंतर राज्यातल्या वाघांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तबच झाले.

Goa: Bangal Tiger
Goa: सावळवाडा, पेडणे येथील युवकाची आत्महत्या

वाघ हा जंगलातील ‘ॲपेक्स प्रिडिएटर’ म्हणजे सर्वोच्च भक्षक आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी प्राधान्यक्रम असलाच पाहिजे. वाघ हा समृद्ध पर्यावरणाचा प्रतीक आहे. त्याचे अस्तित्व हे समृद्ध जंगल आणि विपुल पाणीसुद्धा स्पष्ट करते. युनेस्कोच्या अस्तित्वाच्‍या मानांकनानुसार सध्या वाघ हा संकटग्रस्त प्राणी आहे. जगभरात सुमारे साडेचार हजारांच्या आसपास वाघ आहेत. त्यापैकी ७० टक्के आपल्‍या देशात आहेत. राज्यात पूर्वीपासून वाघ होता आणि सध्याही तो आहे. वाघाच्या ‘बिग कॅट’ फॅमिलीतील बिबटे, काळे बिबटे यांचेही अस्तित्व मोठ्या प्रमाणात राज्यातल्या जंगलांमध्ये आहे. मधल्या काळामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात खाणी सुरू होत्या. त्यामुळे जंगली प्राण्यांची स्थानिक ये-जा (स्थलांतर) अपेक्षित होते, मात्र हे प्राणी परत आपल्या मूळ स्थानी येत आहेत. हे आपल्या राज्याच्या दृष्टीने अत्यंत उत्साहवर्धक आहे.

वाघांची संख्‍या स्‍थिर

अधिवासांचा ऱ्हास, मोठ्या प्रमाणात झालेली बेकायदा शिकार, जंगलतोड यामुळे पृथ्वीवरचा वाघ संपेल की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र २००५ साली टायगर टास्क फोर्सने सुचवलेल्या विविध प्रकारच्या सूचना केंद्र आणि राज्य सरकारने मान्य करून त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. त्‍यामुळे सध्‍या वाघांची संख्या स्थिर आहे. मात्र माणूस आणि जंगली प्राणी यांचे अस्तित्व हे परस्परांवर अवलंबून असल्याने त्यांचे जगणे हे सहजीवनात्मक झाले पाहिजे.

- डॉ. सुनीता नारायण, अध्यक्ष, टायगर टास्क फोर्स

Goa: Bangal Tiger
Goa: दिल्लीत चर्च पाडल्याच्या निषेधार्थ आपच्या 5 युवा कार्यकर्त्यांचा राजीनामा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com