Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांची गोव्यातील युद्धनीती आणि पराक्रमाचा इतिहास

Chhatrapati Shivaji Maharaj History In Goa: पोर्तुगीजांनी गोव्यातील हिंदूंवर धर्मांतराचा अत्याचार केला, त्यामुळे महाराजांना त्यांच्याशी संघर्ष करावा लागला.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak
Published on
Updated on

Shiv Jayanti 2025 Shivaji Maharaj War Strategy And History In Goa

आज 17 मार्च तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी रोजी झाला असला, तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि गोव्याचा इतिहास महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया थोडक्यात माहिती.

शिवजयंती तिथीनुसार

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला, तेव्हा कालगणना ही हिंदू पद्धतीनुसार सुरु होती. म्हणूनच काही लोक इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारीला, तर काही लोक तिथीनुसार अर्थात फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात.

Chhatrapati Shivaji Maharaj
Shiv Jayanti 2025: शिवाजी महाराजांची हुशारी आणि धोरणं, पोर्तुगीजांना घाम फुटवणारी

छत्रपती शिवाजी महाराज आणि गोव्याचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज आणि गोव्याचा इतिहास महत्त्वपूर्ण आहे. महाराजांनी पोर्तुगीज आणि आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या गोव्यात लढाया करुन मराठा सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. पोर्तुगीज हे मराठ्यांचे शत्रू नसले तरी त्यांनी आदिलशाहीला पाठिंबा दिला होता.

पोर्तुगीजांनी गोव्यातील हिंदूंवर धर्मांतराचा अत्याचार केला, त्यामुळे महाराजांना त्यांच्याशी संघर्ष करावा लागला. 1665 मध्ये महाराजांनी गोव्याच्या सीमांवर हल्ले केले.1667 मध्ये त्यांनी सत्तारी (Sattari) आणि फोंडा (Ponda) परिसर जिंकला. तर 1670 मध्ये फोंड्याचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी 1675 मध्ये पुन्हा फोंडा किल्ल्यावर हल्ला करून तो आपल्या ताब्यात घेतला. फोंड्याचा किल्ला मराठ्यांकडे आल्यानंतर पोर्तुगीज आणि मुघलांना मोठा धक्का होता.

Chhatrapati Shivaji Maharaj
Shiv Jayanti Goa: 'शिवरायांमुळे गोव्यातील धर्मांतरणाला चाप बसला, पोर्तुगीजांचा 450 वर्षांचा शिकवला जाणारा इतिहास चुकीचा'; CM Sawant

शिवाजी महाराजांनी काही काळ गोव्याच्या आसपास तळ ठोकला होता. फोंडा, सत्तारी आणि वेर्ले हे भाग मराठा साम्राज्यात काही काळ होते. नंतर संभाजी महाराज आणि पेशव्यांनीही गोव्याच्या सीमेवर अनेक लढाया केल्या आहेत. गोव्यात (Goa) फोंडा किल्ला आणि सत्तारी परिसरात शिवरायांच्या मोहिमेच्या खुणा आढळतात. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या श्री महालसा नारायणी मंदिर आणि श्री शांतादुर्गा मंदिराचे संदर्भही गोव्याशी जोडले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा गोव्याच्या इतिहासावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी पोर्तुगीजांचा सामना करून हिंदू संस्कृतीचे रक्षण केले आणि मराठा साम्राज्याची सीमारेषा गोव्यापर्यंत वाढवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com