Shiv Jayanti Goa: 'शिवरायांमुळे गोव्यातील धर्मांतरणाला चाप बसला, पोर्तुगीजांचा 450 वर्षांचा शिकवला जाणारा इतिहास चुकीचा'; CM Sawant

Goa CM Dr. Pramod Sawant On Shiv Jayanti: गोव्यात केवळ बार्देश, तिसवाडी आणि सासष्टी (साष्टी) या तीनच तालुक्यांवर पोर्तुगीजांचे ४५० वर्षे राज्य होते; मुख्यमंत्री सावंत
Goa CM Dr. Pramod Sawant On Shivjayanti
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa CM Pramod Sawant Highlights Chhatrapati Shivaji Maharaj's Role in Preserving Hindu Culture in Goa

फोंडा: 'छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील धर्मांतरणाला चाप बसला', असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच संपूर्ण गोव्यात पोर्तुगीजांचे ४५० वर्षे राज्य होते असा शिकवला जाणारा इतिहास चुकीचा असल्याचे देखील सावंत म्हणाले. फर्मागुढीच्या किल्ल्यावर गोवा सरकारच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि गोवा यांचा संबंध मांडला. शिवराय अखंड हिंदुस्तानाचे दैवत आहेत. भारतात सर्वात पहिल्यांदा शिवरायांनी नैदल निर्माण केले.

पोर्तुगीजांवर आक्रमण करण्याचे धमक शिवरयांनी दाखवली होती. याबाबत पोर्तुगीजांनी देखील खूप लिहून ठेवले आहे. गोव्यात केवळ बार्देश, तिसवाडी आणि सासष्टी (साष्टी) या तीनच तालुक्यांवर पोर्तुगीजांचे ४५० वर्षे राज्य होते. संपूर्ण गोव्यावर पोर्तुगीजांचे ४५० वर्षे राज्य होते असा शिकवला जाणारा इतिहास चुकीचा आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Goa CM Dr. Pramod Sawant On Shivjayanti
Lavoo Mamledar Death Case: लवू मामलेदार मृत्यू प्रकरणाचा तिढा वाढला; शवचिकित्सा अहवालातून महत्वाची माहिती उघड

उरलेल्या सर्व तालुक्यांवर ( जसे की पेडणे, साखळी, सत्तरी, काणकोण) येथे पहिली २५० शिवशाही होती. येथे शिवाजी महाराजांनी शिवशाही स्थापन केली होती. शिवरायांनी पोर्तुगीजांवर आक्रमण केले त्याचा उद्देश हा केवळ राजकीय आणि धार्मिक होता. यामागे आर्थिक उद्देश नव्हता, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

बार्देशमध्ये पोर्तुगीजांनी धर्मांतरणाचा आदेश काढला त्यावेळी शिवरायांनी मध्यस्थी केली त्यामुळे पोर्तुगीजांना आदेश मागे घ्यावा लागला. याबाबत ब्रिटिश दस्तऐवजांमध्ये माहिती मिळते. गोव्यातील पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीला पहिल्यांदा जाब विचारणारे कोण होते तर, ते शिवाजी महाराज होते, संभाजी महाराज होते, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यातील पहिला जलदुर्ग बेतूल येथे बांधला होता. पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर काब दे राम हा किल्ला देखील शिवरायांच्या आदेशावरुन उभारण्यात आला होता, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. शिवरायांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी संपूर्ण गोव्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली, असेही सावंत म्हणाले.

Goa CM Dr. Pramod Sawant On Shivjayanti
Bulbul Film Festival: ‘बुलबुल’ चित्रपट महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद! पाच हजार विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

छत्रपती संभाजी महाराजांनी गोवा स्वतंत्र करण्यासाठी दोनवेळा प्रयत्न केला. संभाजीराजेंनी हे आक्रमण केले नव्हते तर गोमंतकाला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी ते चालून आले होते. दुर्भाट येथील युद्ध यासंबधित महत्वाचे आहे, असे सावंत म्हणाले. सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार शिवरायांनी केले त्यानंतर अलिकडे गोवा सरकारने पुन्हा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. शिवराय होते म्हणून गोव्यातील धर्मांतरणाला चाप बसला, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com