Ponda Shishirotsav: फोंड्यातील शिशिरोत्सव! नवरदेवाच्या मिरवणुका, शौर्य आणि क्रौर्याचा मिलाफ वीरभद्र

Shishirotsav Festival in Ponda: शिशिरोत्सव हा फोंड्यातील एक महत्त्वाचा उत्सव. या शिशिरोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नवरदेव व वीरभद्राच्या मिरवणुका.
Ponda Virbhadra Navardev Celebration
Ponda Virbhadra Navardev CelebrationDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

शिशिरोत्सव हा फोंड्यातील एक महत्त्वाचा उत्सव. या शिशिरोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नवरदेव व वीरभद्राच्या मिरवणुका. या मिरवणुकांना अनेक पारंपरिक कंगोरे आहेत त्यामुळे त्यांना श्रद्धेचे स्थान लाभले आहे. वरचा बाजार येथील विठोबा देवळासमोर होणाऱ्या या मिरवणुकीना त्यामुळे एक वेगळीच शान लाभली आहे. या मिरवणुकीना मूळचे फोंडावासीय पण आता नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले लोकही आवर्जून उपस्थित राहतात.

यंदा या मिरवणुका , शुक्रवार २८ रोजी संपन्न होणार आहेत. रात्री साधारण आठ वाजता वरचा बाजार येथील बांदोडकर इमारतीपासून नवरदेवाच्या मिरवणुकीला सुरुवात होते. कांद्याच्या पात्याचं बाशिंग बांधलेला नवरदेव, बोडकी करवली व लोकांवर भजी फेकणारा व मधूनमधून नृत्य करणारा भटजी असे या मिरवणुकीचे आकर्षण असतात.

या मिरवणुकीचे केंद्रस्थान म्हणजे भटजी. यातील नवरदेव व करवली दरवर्षी बदलले जातात पण भटजी मात्र तोच असतो. लोककलाकार कै. चंद्रकांत पारकर यांनी या भटजीच्या भूमिकेची मुहूर्तमेढ रोवून नवरदेवाच्या मिरवणुकीला ' ग्लॅमर 'प्राप्त करून दिले. तब्बल साठ वर्षे त्यांनी ही भूमिका सातत्याने सादर केली. गोवा राज्य सरकारने याकरता त्यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानितही केले होते. आता ही भूमिका त्यांचा पुतण्या स्वप्निल पारकर निभावत आहे.

नवरदेवाची मिरवणूक म्हणजे एक धमालच असते त्यामुळे या मिरवणुकीला विठोबा मंदिरपर्यंतचा साधारण फक्त अर्धा किलोमीटरचा प्रवास करायला दीड-दोन तास लागतात. तिथे त्यांचे तिरडीवर झोपलेल्या प्रेताने स्वागत झाल्यावर मिरवणुकीची इतीश्री होते. नंतर राजू वेरेकर यांच्या कीर्तनाने विरभद्राच्या आगमनाची नांदी आळवली जाते.

नवरदेवाची मिरवणूक म्हणजे करमणुकीची आतषबाजी तर वीरभद्राची मिरवणूक म्हणजे भक्तीरसाचे विविध रंग. दहाच्या सुमारास जळते पलिते घेऊन वीरभद्राचे आगमन होते. शौर्य आणि क्रौर्य यांचा मिलाफ म्हणजे हा वीरभद्र.

Ponda Virbhadra Navardev Celebration
Bicholim Shigmo Festival: डिचोलीत दुमदुमणार ‘घुमचे कटर घूम’चा आवाज! बोर्डेतून मिरवणूक; चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धा

साधारण अर्धा तास तांडव नृत्य केल्यानंतर विठोबा देवळासमोर वीरभद्रला ग्लानी येते आणि भाविकांनी त्याला उचलून नेल्यावर मिरवणुकीची सांगता होते. वीरभद्राला भाविकांच्या श्रद्धेची किनार असल्यामुळे या मिरवणुकीत भाविक गुंतून जातात व त्याला वेगवेगळ्या नावाने पुकारून त्याच्यात ऊर्जा निर्माण करतात. वीरभद्राच्या नाचण्याची एक वेगळीच लय असते. कै. पुरुषोत्तम पारकर, कै. सच्चित खानोलकर, कै. श्री प्रसाद शिरसाट यासारख्या दिग्गज कलाकारांनी हा वीरभद्र तन्मयतेने साकार केला आहे.

Ponda Virbhadra Navardev Celebration
Kalotsav: पोर्तुगीज येण्यापूर्वी विकसित झालेली गोमंतकीय नाट्यपरंपरा 'कालोत्सव', समाजातल्या प्रवृत्तींचे दर्शन घडवणारा 'शंकासूर'

तब्बल पन्नास वर्षे वीरभद्राची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद शिरसाट यांना या भूमिकेसाठी गोवा सरकारचा कला गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. आता ही भूमिका फोंड्याचे एक ज्येष्ठ रंगकर्मी जितेंद्र पारकर साकार करत असतात. स्वप्निल व जितेंद्र हे दोघेही आपापल्या भूमिका समरस होऊन करत असल्यामुळे असल्यामुळे मिरवणुकांचा लोभस अंदाज आजही कायम आहे. या मिरवणुकीचा अनुभव घेणे म्हणजे एक वेगळाच आनंद असल्यामुळे, मूल्ये बदलत जाऊनही या मिरवणुका आपले स्थान राखण्यात यशस्वी ठरल्या आहेत हेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com