Goa Smart Village: शिरोडा मतदारसंघामध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्प सुरू! स्वयंपूर्ण गोवा सीएसआर परिषद २०२४’मध्ये घोषणा

Shiroda: स्मार्ट व्हिलेज प्रकल्प हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमाचा प्रमुख घटक आहे
Shiroda: स्मार्ट व्हिलेज प्रकल्प हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमाचा प्रमुख घटक आहे
Goa csr conference 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा सरकारद्वारे भारत सीएसआर नेटवर्कसमवेत सहकार्य करार करत शिरोडा मतदारसंघामध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्प सुरू केला आहे. ही ऐतिहासिक घोषणा नुकत्याच झालेल्या ‘स्वयंपूर्ण गोवा सीएसआर परिषद २०२४’मध्ये करण्यात आली.

स्मार्ट व्हिलेज प्रकल्प हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमाचा प्रमुख घटक आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, सुलभ आरोग्यसेवा आणि शाश्वत ऊर्जा उपायांद्वारे संपूर्ण गोवा राज्यातील ग्रामीण समुदायांमध्ये परिवर्तन घडवून आणणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

Shiroda: स्मार्ट व्हिलेज प्रकल्प हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमाचा प्रमुख घटक आहे
Tiracol Village: गोवा मुक्तीनंतर तेरेखोलमध्ये हे पहिल्यांदाच घडतंय; आता महाराष्ट्रावर अवलंबून रहावे लागणार नाही

या प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी शिरोडा मतदारसंघाचे आमदार व जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, राज्य शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, राज्य जलसंपदा संचालक (प्रशासन)

तसेच स्वयंपूर्ण गोवा उपक्रमासाठीचे तालुका नोडल अधिकारी गौरेश कुर्टीकर, भारत सीएसआर नेटवर्कचे संस्थापक चेअरमन डॉ. साजिद सय्यद, राज्य नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. कैलास गोखले, उत्तर गोवा जिल्हा पंचायतचे सदस्य व हरमलचे प्रतिनिधी रंगनाथ कलशावकर, बेतोडा-निरंकाल ग्रामपंयातीचे संयोजक/स्वयंपूर्ण मित्र चंद्रकांत शेटकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, स्वयंपूर्ण मित्र आणि प्रमुख भागधारकांचाही सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com