Tiracol Village: गोवा मुक्तीनंतर तेरेखोलमध्ये हे पहिल्यांदाच घडतंय; आता महाराष्ट्रावर अवलंबून रहावे लागणार नाही

Goa Electricity Department: स्थानिक आमदारांच्या प्रयत्नांना यश
Goa Electricity Department: स्थानिक आमदारांच्या प्रयत्नांना यश
Electricity in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा मुक्तीनंतर प्रथमच तेरेखोल गावाला गोव्यातून वीजपुरवठा होणार आहे. या वीजपुरवठ्याचा शुभारंभ मंगळवार, २ रोजी सायंकाळी स्थानिक आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते होणार आहे. गोवा मुक्तीनंतरही तेरेखोल गावासाठी सिंधुदुर्ग-महाराष्ट्र भागातून वीजपुरवठा केला जात होता.

केरी आणि तेरेखोल या भागामधून तेरेखोल नदी वाहत असल्यामुळे तेरेखोल गाव पलीकडे तर केरी गाव अलीकडे पडत होता. तसेच या तेरेखोल नदीवर पूल नसल्यामुळे वीज, पाणी, भूमिगत केबल नेताना अडचणी येत होत्या. त्यामुळे महाराष्ट्र भागातून या गावाला वीजपुरवठा केला जात होता.

Goa Electricity Department: स्थानिक आमदारांच्या प्रयत्नांना यश
Querim Beach : सेल्फीच्या नादात चौघे बुडाले; केरी-पेडणेतील दुर्घटना

तेरेखोल नदीवर पूल नसल्यामुळे तेरेखोल गावासाठी गोव्यातून वीज, पाणी या मूलभूत सुविधा पुरवताना खूप अडचणी येत होत्या. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सरकार दरबारी प्रयत्न करून तेरेखोल गावासाठी भूमिगत जल केबल घालून वीजपुरवठा करण्याची योजना आखली होती. सरकारने २०२१ साली केरी-तेरेखोल या नदीमधून भूमिगत वीज केबल घालून या गावासाठी वीजपुरवठा करण्याची योजना आखली. त्यासाठी ४ कोटी ४४ लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आणि ते कामही पूर्ण झाले.

Goa Electricity Department: स्थानिक आमदारांच्या प्रयत्नांना यश
Tiracol Fort: वास्तूकलेचा अनोखा नजारा आहे महाराष्ट्र-गोवा सीमेजवळील तेरेखोल किल्ला

आमदारांच्या प्रयत्नांना यश

या गावासाठी वीजपुरवठा गोवा राज्यातून व्हावा यासाठी स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी सरकार दरबारी भरपूर प्रयत्न केले. त्या ठिकाणी भूमिगत वीज केबल घातल्यानंतर राज्यातून वीजपुरवठा करण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि कामही पूर्ण झाले. त्याच अनुषंगाने मंगळवार, २ रोजी सायंकाळी गोवा मुक्तीनंतर प्रथमच राज्यातून तेरेखोल गावासाठी वीजपुरवठा सुरू केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Cabinet Decision Medical Education
Goa Government Employee Relief
Calangute traffic cell electricity cut unpaid bill Goa
Goa power distribution ranking 2025
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com