Shiroda: संतापजनक! दरवाजा फोडून केली चोरी, नंतर दुकानच दिले पेटवून; 12 लाखांचे नुकसान

Shiroda Shop Theft: बाजार - शिरोडा येथील भरवस्तीतील ‘अमिषा जनरल स्टोअर’ या दुकानात चोरी करून चोरट्यांनी दुकानाला आग लावल्याने दुकानातील सर्व माल जळून खाक झाला.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

शिरोडा: बाजार - शिरोडा येथील भरवस्तीतील ‘अमिषा जनरल स्टोअर’ या दुकानात चोरी करून चोरट्यांनी दुकानाला आग लावल्याने दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. या दुर्घटनेत सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिरोडा बाजारातील पंचायत इमारतीत असलेल्या या ‘जनरल स्टोअर’मध्ये आज सोमवार पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा मागचा दरवाजा फोडून दुकानात प्रवेश केला व चोरट्यांनी काही सामान पिशव्यात भरून बाहेर ठेवले.

त्यानंतर मौल्यवान वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला व दुकानाला आग लावली. त्यामुळे दुकानातील दोन रेफ्रिजरेटर, झेरॉक्स मशीन, कडधान्य, स्टेशनरी आदी साहित्य जळून खाक झाले. रात्रीची वेळ असल्याने हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही.

Crime News
Cuncolim IDC Fire: बेचिराख! कुंकळ्ळी आयडीसी परिसरात आगीचे थैमान; लाखोंचे साहित्य जळून खाक

कोणीतरी मालक आणि फोंडा अग्निशमन दलाला या आगीच्या घटनेची माहिती देताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोचले, परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व माल जळून खाक झाला होता. पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान दुकानातील आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.

Crime News
Usgao Theft: दार तोडले, महिलेच्या तोंडात कोंबला बोळा! पालवाडा-उसगावात चोरांचा धुमाकूळ; 4 लाखांचा ऐवज लंपास

यासंबंधी शिरोडा आणि फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली गेली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. अद्याप कोणत्याच संशयिताला ताब्यात घेतले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com