Shirgaon Stampede: शिरगाव दुर्घटनेसाठी विद्यमान देवस्थान समिती जबाबदार; महाजनांची प्रशासक नेमण्याची मागणी

Mahajans Demand Committee Dismissal: या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यमान देवस्थान समितीने पायउतार व्हावे, अशी मागणी गणेश गावकर यांनी केली आहे. माझ्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाल्याचा विद्यमान अध्यक्षांचा आरोप दिशाभूल करणारा असल्याचे देखील गावकर म्हणाले.
Mahajans demand committee dismissal
Mahajans Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शिरगाव दुर्घटनेला विद्यमान देवस्थान समितीच जबाबदार असून, सरकारने विनाविलंब विद्यमान देवस्थान समिती बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी देवस्थान समितीचे मावळते अध्यक्ष गणेश गावकर आणि इतर पदाधिकाऱ्यांसह महाजनांनी केली आहे.

आपली चूक लपवण्यासाठी दीनानाथ गावकर यांच्या अध्यक्षतेखालील देवस्थान समिती आता दुर्घटनेचे खापर प्रशासनावर फोडत आहे, अशी टीकाही गणेश गावकर, गुणाजी गावकर, माजी सरपंच सदानंद गावकर आदी महाजनांनी बुधवारी (28 मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. जत्रेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी सरकारने (Government) नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीने या दुर्घटनेला देवस्थान समितीलाच दोषी धरले असून, विद्यमान देवस्थान समितीविरोधात गुन्हाही नोंद झाला आहे. असे गणेश गावकर आणि अन्य महाजनांनी म्हटले आहे.

Mahajans demand committee dismissal
Shirgaon Stampede: देवस्थान समितीचा मोठा निर्णय! शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा

या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यमान देवस्थान समितीने पायउतार व्हावे, अशी मागणी गणेश गावकर यांनी केली आहे. माझ्या कार्यकाळात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा विद्यमान अध्यक्षांचा आरोप दिशाभूल करणारा आहे, असा दावा गणेश गावकर यांनी करून हा आरोप सिद्ध करण्याचे विद्यमान अध्यक्ष दीनानाथ गावकर यांना आव्हान दिले आहे.

Mahajans demand committee dismissal
Shirgaon Lairai Jatra: शिरगांवात 'होमकुंडाच्या' तयारीला सुरुवात 2 मे रोजी भरणार श्रीदेवी लईराईची जत्रा

महाजनांची सभा बेकायदा

गेल्या रविवारी श्री लईराई देवस्थानच्या महाजनांची जी सर्वसाधारण सभा झाली, ती नियमबाह्य आहे. या सभेत अगोदर महाजनांच्या सह्या घेऊन नंतर ठरावांची नोंद केली आहे, असे महाजन गुणाजी गावकर आणि सदानंद गावकर यांनी सांगून, रविवारची आमसभा बेकायदा असल्याचा दावा केला आहे. सत्यशोधन समितीचा अहवाल फेटाळण्याचा, चेंगराचेंगरीला देवस्थान समितीला जबाबदार धरू नये, चेंगराचेंगरीला प्रशासन जबाबदार आहे, असा कोणताच ठराव आमसभेत संमत झालेला नाही, असे देवस्थानचे माजी सचिव भगवंत गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com