शिरगावात 'मॉक ड्रिल' यशस्वी; मात्र नियोजनात मोठी विसंगती, दीड हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग; जेवणाची व्यवस्था नसल्याने उपासमारीची वेळ

Shirgao mock drill mismanagement: श्री लईराई देवीच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) मध्यरात्री शिरगाव येथे घेण्यात आलेले ''मॉक ड्रिल'' यशस्वी ठरले, मात्र मोहिमेच्या आयोजनात विसंगती दिसून आली.
Shirgao mock drill mismanagement
Shirgao mock drill mismanagementDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: श्री लईराई देवीच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) मध्यरात्री शिरगाव येथे घेण्यात आलेले ''मॉक ड्रिल'' यशस्वी ठरले, मात्र मोहिमेच्या आयोजनात विसंगती दिसून आली. धक्कादायक बाब म्हणजे मध्यरात्रीपर्यंत ताटकळत राहिलेल्या पोलिसांसह सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित बहुतेक कर्मचाऱ्यांवर चक्क उपासमारीची वेळ आली.

''मॉक ड्रिल''मध्ये सहभागी पोलिसांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या जेवणाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परिणामी, रात्रभर या कर्मचाऱ्यांना उपाशी राहावे लागले. या प्रकाराबाबत बहुतेक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. देश-विदेशात नावलौकिक प्राप्त झालेल्या लईराई देवीच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) रात्री शिरगाव येथे हे ''मॉक ड्रिल'' घेण्यात आले.

Shirgao mock drill mismanagement
Goa Divorce Cases: गेल्‍या 5 वर्षांत तुटल्‍या 2,135 जोडप्‍यांच्‍या साताजन्‍माच्‍या गाठी, राज्‍यात घटस्‍फोटांचा 'स्‍फोट'; सासष्‍टी आघाडीवर

जत्रेदरम्यान एखादी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना कसा करावा तसेच मदतकार्य कसे करावे, याची तालीम करण्यासाठी गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेतर्फे हे ''मॉक ड्रिल'' घेण्यात आले.

जिल्हाधिकारी अंकित यादव यांची उपस्थिती

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हे ''मॉक ड्रिल'' पार पडले. यामध्ये कमांडो, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य आणि अन्य आपत्कालीन यंत्रणांचे मिळून सुमारे दीड हजार कर्मचारी सहभागी झाले होते.

Shirgao mock drill mismanagement
Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

पूर्वनियोजनानुसार रात्री नऊ वाजता हे ''मॉक ड्रिल'' होणार होते. त्यासाठी पोलीस आणि इतर कर्मचारी सायंकाळीच शिरगावात दाखल झाले होते. मात्र, मध्यरात्रीपर्यंत प्रत्यक्ष ''मॉक ड्रिल'' सुरू झाले नव्हते.

मध्यरात्री पोलिसांना त्यांचे ड्युटी पॉइंट दाखविल्यानंतर होमकुंड परिसरात ''मॉक ड्रिल'' घेण्यात आले. तत्पूर्वी संबंधित विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या ''मॉक ड्रिल''मध्ये विविध शासकीय खात्यांचे प्रमुख सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com