Lairai Jatra: शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या भाविकांची गय करू नका, मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा यंत्रणेला स्पष्ट आदेश; शिरगावात 'मॉक ड्रिल'

Shirgao Lairai Jatra: जत्रेच्या दिवशी शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या भाविकांची कोणतीही गय करू नका. सर्व भाविकांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी दिले.
Shirgao Lairai Jatra
Shirgao Lairai JatraDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: जत्रेच्या दिवशी शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या भाविकांची कोणतीही गय करू नका. सर्व भाविकांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी दिले. जत्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री लईराई देवीच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री शिरगाव येथे आयोजित करण्यात आलेले ‘मॉक ड्रिल’ यशस्वीरीत्या पार पडले. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. देश-विदेशात ख्याती असलेली लईराई जत्रा यंदा मंगळवारी (ता. २१) साजरी होणार आहे.

Shirgao Lairai Jatra
Goa Municipal Elections: पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये? कायद्यात दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी; वटहुकूम लवकरच जारी होणार

गेल्या वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष दक्षता घेतली जात आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा, मदतकार्य कसे राबवावे आणि सुरक्षा यंत्रणांतील त्रुटी ओळखण्यासाठी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेतर्फे ही रंगीत तालीम घेण्यात आली.

Shirgao Lairai Jatra
Goa Crime: बंद घरात माय-लेकीचा मृतदेह; केपेत खळबळ, तीन दिवसांनी प्रकार उघड

मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात

या ‘मॉक ड्रिल’मध्ये पोलिस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच अन्य आपत्कालीन यंत्रणांचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या वेळी आमदार प्रेमेंद शेट, उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक हरिष मडकईकर, वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई, पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही., पोलिस निरीक्षक विजय राणे, वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस, आरोग्याधिकारी डॉ. सिद्धी कांसार, अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर तसेच विविध सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com