Shelvan Assolda: शेळवण ग्रामस्थांचा जेटी, रेल्वेपुलाविरोधात एल्गार! 'कोळसा वाहतुकी'वरुन आरोप; विरोधाचा ठराव मंजूर
Shelvan Assolda Jetty Flyover
केपे: असोल्डा पंचायत क्षेत्रातील शेळवण येथे होऊ घातलेली जेटी आणि रेल्वे उड्डाण पुलाला लोकांनी आज तीव्र विरोध दर्शविला. हा पूल, रस्ता आणि जेटी कोळसा वाहतुकीसाठी उभारली जात असल्याचा आरोप करत ग्रामसभेत याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. अशा कोणत्याही प्रकल्पांना थारा देणार नाही, अशी कठोर भूमिका ग्रामस्थांनी आज घेतली.
शेळवण येथे तारकर कंपनीची जेटी येत असल्याचे समजताच काही दिवसांपासून लोकांनी याविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली होती. आजच्या ग्रामसभेत जेटी, रस्ता तसेच रेल्वे उड्डाण पुलाला लोकांनी विरोध करून २०११ साली पंचायत मंडळाने दिलेले सर्व ना हरकत दाखले रद्द करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
उड्डाण पुलासाठी जो रस्ता तयार करण्यात येत आहे, त्याची रुंदी ८० मीटर असल्याने या रस्त्यासाठी शेकडो झाडांची कत्तल होणार असल्याची भीती यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. यासंदर्भात सरपंच किस्तोद फर्नांडिस म्हणाले की लोकांनी ग्रामसभेत ज्या सूचना आणि प्रस्ताव मांडले, ते आम्ही आमदार नीलेश काब्राल यांच्यासमोर मांडणार आहोत.
रस्ता-जेटीचा अहवाल खोटा
ज्या ठिकाणी जेटी अस्तित्वातच नाही, त्या ठिकाणी जेटी असल्याचा खोटा अहवाल दिल्याने ‘सीआरझेड’ने या जेटीला मान्यता दिली होती. तसेच या जेटीकडे जाण्यासाठी रस्ताही अस्तित्वातच नाही, त्याठिकाणी सुमारे ४० मीटर रस्ता असल्याचे दाखविल्याने या जेटीवरून कोळसा वाहतूक करण्याचा कंपनीचा छुपा डाव असल्याचे सांगत त्याला आज पुन्हा जोरदार विरोध करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.