Attempted Murder Case: शरीफ शेखचा जामीन अर्ज फेटाळला; पीडिता, साक्षीदारांना धमकावल्याची न्यायालयाकडून दखल

South Goa attempted murder case: खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील संशयित शरीफ शेख याचा जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
South Goa attempted murder case
South Goa attempted murder caseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव : खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील संशयित शरीफ शेख याचा जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. यापूर्वी जामिनावर असताना तक्रारदार व साक्षीदारांना धमकावल्याने न्यायालयाने पुन्हा जामीन देण्यास नकार दिला.

शरीफ याच्यावर पैशांच्या वादातून आपल्या बहिणीच्या घरात घुसून तिच्या मुलीवर, म्हणजेच भाचीवर, चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. २६ एप्रिल २०२२ रोजी त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

South Goa attempted murder case
Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

मात्र, जामिनावर बाहेर असताना त्याने तक्रारदार बहीण व तिच्या मुलींना कॉलेज, दुकान आदी ठिकाणी जाऊन गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर ३ जानेवारी २०२४ रोजी न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करून त्याची कोलवाळ कारागृहात रवानगी केली.

संशयिताच्या वकिलांनी तो दोन वर्षे सात महिन्यांपासून तुरुंगात असून आजारी असल्याचे तसेच मुख्य साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून झाल्याने जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी जामिनास विरोध करत संशयित बाहेर आल्यास साक्षीदारांना धोका निर्माण होऊन त्यांच्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली.

South Goa attempted murder case
Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा गंभीर असून त्यासाठी जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. यापूर्वी मिळालेल्या जामिनाचा गैरवापर करून साक्षीदारांना धमकावल्याची बाबही न्यायालयाने गंभीर मानली. संशयिताच्या आजारांवर कारागृहात उपचार होऊ शकतात, असे नमूद करत साक्षीदारांच्या सुरक्षेचा विचार करून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com