Sawantwadi: सावंतवाडीत 2 गटांत राडा! मारहाण, अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न; पुणे, सिंधूदुर्गातील 9 जणांना अटक

Sawantwadi Crime: शनिवारी (ता. २५) दुपारपासून सुरू झालेला हा प्रकार मध्यरात्री पाऊणवाजेपर्यंत सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी फर्यादींवरून पुणे व सिंधुदुर्गातील नऊ जणांना अटक केली.
Sawantwadi Crime News
Sawantwadi Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

सावंतवाडी: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या पावणेपाच कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून शहरात दोन गटांत मोठा राडा झाला. यातून अपहरणाचा प्रयत्न, हाणामारी, अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न, दगडफेक आणि घरफोडीचा प्रयत्न, असे गंभीर प्रकार घडले.

शनिवारी (ता. २५) दुपारपासून सुरू झालेला हा प्रकार मध्यरात्री पाऊणवाजेपर्यंत सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी फर्यादींवरून पुणे व सिंधुदुर्गातील नऊ जणांना अटक केली असून, त्यांना मंगळवारपर्यंत (ता. २८) दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ११ संशयितांपैकी उर्वरित दोन संशयित पसार झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी आज दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : ​पुणे येथील रहिवासी शंभुराज देवकाते यांनी सावंतवाडीतील रहिवासी सागर कारिवडेकर यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी चार कोटी ७५ लाख रुपये दिले होते. या रकमेच्या परतफेडीवरून दोघांमध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती.

Sawantwadi Crime News
Delhi Crime: एक महिन्यापासून देता होता त्रास, दुचाकीवरुन पाठलाग करुन विद्यार्थिनीवर केला ॲसिड हल्ला; ओळखीतल्या तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कारिवडेकर सध्या पैसे देण्यात असमर्थ असल्याने, त्यांनी पुण्यातील संशयितांना सावंतवाडी-सर्वोदयनगर येथील बंगल्यातील आपली आलिशान मोटार घेऊन जाण्यास सांगितले होते. याच मोटारीचा ताबा घेण्यासाठी देवकाते हे अन्य चार साथीदारांना घेऊन आपल्या मोटारीने शनिवारी (ता. २५) दुपारी सावंतवाडीत दाखल झाले.

Sawantwadi Crime News
Goa Crime: वेफर्स-कॉफीच्या पाकिटातून कोकेन विक्री, आंतरराष्ट्रीय रॅकेटवर ED ची नजर; 43 कोटींच्या तस्करीप्रकरणी 7 जणांवर गुन्हा

​संशयितांनी सर्वप्रथम कारिवडेकर यांचे सुपरवायझर नितीन मेस्त्री यांना बोलावून घेतले. आलिशान मोटारीचा ताबा देण्यास मेस्त्री यांनी टाळाटाळ केल्याने, संशयितांनी त्यांना मारहाण करून बंगल्यात डांबले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com