Sharad Ponkshe Goa Kala Academy
Sharad PonksheDainik Gomantak

Kala Academy: साऱ्या प्रेक्षकांनीही सुपारी घेतली होती का? अभिनेते पोंक्षेंचे गावडे यांना प्रत्युत्तर; विचार करून बोलण्याचे केले आवाहन

Sharad Ponkshe: मी कुणाची सुपारी घेऊन बोलण्याचा संबंधच येत नाही, असे ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार शरद पोंक्षे यांनी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना म्हणाले.
Published on

पणजी: मी गोव्यात नव्हे, तर महाराष्ट्रात राहतो. माझा कुणाशीही कसलाच राजकीय संबंध नाही. त्यामुळे मी कुणाची सुपारी घेऊन बोलण्याचा संबंधच येत नाही, असे ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार शरद पोंक्षे यांनी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना म्हणाले.

महाराष्ट्रातील बीड या गावातील एक नाट्यगृह जे अतिशय घाणेरडे होते, त्या नाट्यगृहाबद्दलही मी असंच बोललो होतो. तो माझा व्हिडिओदेखील सर्वत्र पसरलेला आहे. मला जेव्हा नाट्यगृहाबद्दल घाणेरडा अनुभव येतो, तेव्हा मी त्याबद्दल बोलतोच, असे पोंक्षे यांनी ठणकावून सांगितले.

ते पुढे म्हणाले, की मला गोव्याच्या कला व संस्कृती खात्याच्या मंत्र्यांचे नाव देखील ठाऊक नव्हते. पत्रकारांनी मला सांगितल्यावर ते कळले. मी नाट्यगृहाबद्दल बोललोच आहे; पण प्रेक्षागृहातील प्रेक्षकही काय बोलत होते ते एकदा ऐका म्हणावं. त्या साऱ्या प्रेक्षकांनी देखील सुपारी घेतली होती का? प्रेक्षकच ओरडून सांगत होते, की सगळंच आमच्या हाताबाहेर गेले आहे. मी कुणावरच वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. जे सुपारी घेतात त्यांच्याच डोक्यात असले सुपारी-बिपारी वगैरे विषय येतात. मी कुणी गुंड नाही. मी कलावंत आहे. सुपारी घेऊन जे काही करायचं असेल ते तुम्ही करा, तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ! तुमच्या डोक्यातील विकृत विचार आमच्या तोंडात घालू नका.

Sharad Ponkshe Goa Kala Academy
Kala Academy Controversy: शरद पोंक्षेंच्या आवाजानं हादरली 'झोपी गेलेली' व्यवस्था, कोण सांभाळणार गोमंतकीय संस्कृतीचा वारसा?

दोन ‘फ्लड्स’ वापरून नाटक केले

पोंक्षे म्हणाले, की एअर कंडिशनमधून जो बर्फ खाली कोसळत होता, तो काय आम्ही सुपारी घेतली म्हणून कोसळत होता? मी सुपारी घेतली म्हणून नाट्यगृहाच्या लाईट्स फ्लिकर झाल्या काय? जे झालं ते केवळ दोन मिनिटांसाठी होत? हे खोटं सांगतो आहे तो माणूस. ही गडबड फक्त दोन मिनिटांसाठी नव्हती, तर त्या लाईट्समुळे आमचे सगळे नाटक आम्हाला दोन ‘फ्लड्स’ वापरून करावे लागले.

Sharad Ponkshe Goa Kala Academy
Kala Academy: 'शरद पोंक्षे साहेब, तुम्ही गैर बोललात'! मंत्री गावडे यांचे शरसंधान; काही प्रश्नांना दिली बगल

मंत्र्यांनी बोलताना विचार करावा

प्रकाश योजना ही नाटकाची रंगत वाढविण्यासाठी असते. ती प्रकाशयोजना ‘पुरुष’ या नाटकावेळी आम्ही करू शकलो नाही. जे लोक तिकीट काढून नाटकासाठी आले होते, त्यांना प्रकाश योजनेची ती रंगतच अनुभवता आली नाही. मंत्र्यांनी बोलताना विचार करायला हवा होता, असेही पोंक्षे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com