सर्वण येथील कलाकारांनी रंगविला पारंपरिक 'शंखासूर काला'

तब्बल पंधरा वर्षांच्या खंडानंतर घडले स्थानिक लोककलेचे दर्शन
Kalotsav in Bicholim
Kalotsav in BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : गावची परंपरा आणि लोककलेचे दर्शन घडविणारा 'शंखासूर' अर्थातच 'पारंपरिक काला' डिचोली तालुक्यातील सर्वण येथे रंगतदारपणे सादर करण्यात आला. श्री कुळमाया सातेरी श्यामपुरुष देवाच्या वार्षिक कालोत्सवानिमित्त स्थानिक कलाकारांनी पारंपरिक काल्याचे प्रभावी आणि उत्कृष्टपणे सादरीकरण करून उपस्थित रसिकांकडून दाद मिळवली. तब्बल पंधरा वर्षांच्या खंडानंतर स्थानिक ज्येष्ठ कलाकारांनी बालकलाकारांच्या मदतीने पारंपरिक काला प्रत्यक्ष रंगभूमीवर आणताना गावची लोककला पुनर्जिवीत करताना या लोककलेशी जोडलेली नाळ अजूनही शाबूत असल्याचा दाखलाच दिला. (Kalotsav in Bicholim News Updates)

Kalotsav in Bicholim
'निवडणुकीत महिलांचा गैरप्रकारे फायदा घेणं बंद करावे'

जत्रा वा कालोत्सवात सादर होणारा 'पारंपरिक काला' म्हणजे एक लोककला प्रकार. बहूतेक भागात स्थानिक कलाकार अजूनही ही लोककला जोपासून आहेत. डिचोली (Bicholim) तालुक्यातील सर्वण गावात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येणारा पारंपरिक काला बराच प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या जवळपास पंधरा वर्षांपासून दशावतारी नाट्यमंडळाकडून काला सादर करण्यात येत होता. त्यामुळे सर्वणवासियांसह लोककलाप्रेमींना सर्वण गावच्या लोककलेचे दर्शन घडले नव्हते. यंदा मात्र कळस मानकरी आणि स्थानिक जाणत्या कलाकारांच्या मदतीने गावातील एक ज्येष्ठ लोककलाकार गणेश घाडी यांनी मेहनत घेत 'पारंपरिक काला' ही लोककला पुन्हा एकदा जिवंत करताना रंगमंचावर आणली.

Kalotsav in Bicholim
मागील 8 वर्षात फोंड्यातील अपघातांमध्ये 'इतक्या' लोकांनी गमावला जीव

सर्वणमध्ये पारंपरिक काला रंगला

श्री गणेश वंदना आणि नृत्य तसेच शंखासूर वध हे गोव्यातील (Goa) सर्वण येथील पारंपरिक काल्याचे वैशिष्ट्य. या पारंपरिक काल्यात स्वतः गणेश घाडी यांनीच पुर्वीप्रमाणेच भटजी आणि शंकासूर या प्रमुख भूमिका साकारल्या. तर अनुज तुकाराम सावंत (श्रीकृष्ण), मंजित दयानंद सावंत (गणपती), कोमल गोकुळदास सावंत आणि सोनल मोहनदास सावंत (रिद्धी-सिद्धी) आणि रौनक राजेश सावंत (ब्रह्मदेव) या बालकलाकारांनी (Artist) आपापल्या पात्रांना योग्य न्याय देत 'काल्या'ची रंगत वाढवली. नरहरी सूर्या सावंत यांनी हरदास आणि गायनाची बाजू सांभाळली. तर रुपेश बाळगो सावंत (हार्मोनियम), नामदेव जयदेव सावंत (पखवाज), दत्ताराम चंद्रकांत सावंत, गुरूदास श्रीपाद सावंत (झांज) आणि राघलो चंद्रकांत सावंत या कलाकारांनी काल्यातील पात्रांना प्रभावीपणे साथ दिली. त्यामुळे हा काला उत्तरोत्तर रंगत गेला. उपस्थितांनी काल्याला भरभरून प्रतिसाद देतानाच कलाकारांचे अभिनंदन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com