'निवडणुकीत महिलांचा गैरप्रकारे फायदा घेणं बंद करावे'

आमोणकर यांनी सदैव महिलांचा दुरुपयोग केला असल्याने काँग्रेस बरोबर फिरणाऱ्या महिलांनी सावध रहावे
Milind Naik Congress
Milind Naik CongressDainik gomantak
Published on
Updated on

मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्यावर वासना कांडाचे बिनबुडाचे आरोप करणारे, काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी पणजी महिला पोलिस स्थानकात नाईक विरोधात दाखल केलेली तक्रार फेटाळल्यानंतर आमोणकर यांनी निवडणुकीत महिलांचा गैर प्रकारे फायदा घेणे बंद करावे. अशा निर्वाणीचा इशारा मुरगाव भाजप मंडळाकडून देण्यात आला आहे.

आमोणकर यांनी सदैव निवडणुकीच्या (elections) काळात आमदार (MLA) मिलिंद नाईक (Milind Naik) वर महिलावर विनयभंग, वासना कांडाचे बिनबुडाचे आरोप केलेले आहे. कारण आमोणकर वैफल्यग्रस्त बनले असल्याने खालच्या दर्जाचे राजकारण करीत असल्याचा आरोप मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी केला आहे.

Milind Naik Congress
'उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारून भाजप चूक करतय'

मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी पणजी महिला पोलिस स्थानकात नाईक यांचा वासना कांडात असल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर महिला पोलिसांनी संकल्प आमोणकर यांनी दिलेली तक्रार कोणताही सुगावा आमदार मिलिंद नाईक वर आढळला नसल्याने फेटाळून लावली होती.

आमोणकर यांनी दरवेळी विधानसभा निवडणूक जवळ येताच आमदार मिलिंद नाईक वर फक्त महिलांच छळ करण्याचा आरोप करण्याचे षड्यंत्र रचले असल्याचा आरोप मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी बुधवार (दि.19) आयोजित पत्रकार परिषदेतून केला. यावेळी मुरगाव भाजप मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत परब, युवा मोर्चाचे संदीप मालवणकर, मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेविका मंजुषा पिळणकर, मृणाली मांजरेकर, नगरसेवक दामू नाईक, दयानंद नाईक, रामचंद्र कामत, लिओ रॉड्रिगीस, माजी नगरसेवक मुरारी बांदेकर उपस्थित होते.

Milind Naik Congress
'निवडणुकीचे तिकीट देण्यासाठीच मिलींद नाईकांची केस बंद'

पुढे बोलताना नगराध्यक्ष संजय सातार्डेकर म्हणाले की राज्य महिला पोलिसाकडून (police) संकल्प आमोणकर यांना चपराक पडल्यानंतर आमोणकर यांनी निवडणूक राजकीय व्यासपीठावरून दाखवावी. दरवेळी निवडणुकीत महिलावर्गाचा गैरफायदा घेऊन आमदार मिलिंद नाईक वर आरोप करणे थांबवावे. कारण चुकीच्या मार्गाने आरोप करणारे सदैव पराजित होतात अशी माहिती सातार्डेकर यांनी दिली.

माजी नगरसेवक मुरारी बांदेकर यांनी सांगितले की 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) संकल्प आमोणकर यांनी महिलाचा गैरफायदा घेऊन आमदार मिलिंद नाईक यांच्यावर विनयभंगाची तक्रार मुरगाव पोलीस स्थानकात दाखल केली होती. पुढे न्यायालयाने विनयभंगाचा खटला फेटाळून लावला होता. आमोणकर यांनी सदैव महिलांचा दुरुपयोग केला असल्याने काँग्रेस बरोबर फिरणाऱ्या महिलांनी सावध रहावे असा इशारा बांदेकर यांनी दिला.

शशिकांत परब यांनी पत्रकार परिषदेतून काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर टीका करताना सांगितले की उगाच कुणाच्या सांगण्यावरून वासना काडाचे बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे. आमदार नाईक यांच्यावर केलेले आरोप फेटाळल्यानंतर चोडणकर गप्प का राहिले, असा प्रश्नशेवटी परब यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com