मडगाव: मडगाव मधील कचरा उठावाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता त्याला वेगळे वळण लागण्याची स्थिती निर्णाम झाली आहे. मडगाव नगरपरिषदेने नियुक्त केलेल्या कचरा व्यवस्थापन संस्थेच्या भरमसाट बिलांवरून रणकंदन माजण्याची शक्यता आहे. तर शॅडो कौन्सिल ऑफ मडगाव आक्रमक झाली असून देयवरून परिषदेकने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
(Shadow Council of Madgaon aggressive on payment of waste management agency)
यावर SCM संयोजक सॅवियो कौटिन्हो यांनी सांगितले की, कौन्सिल एका कंत्राटदाराला दरमहा जवळपास 15 लाख रुपये देत आहे. ज्याला घरोघरी कचरा गोळा करणे आणि ब्लॅक स्पॉट्सवर आढळलेल्या कचऱ्याचे विलगीकरण करून ब्लॅक स्पॉट्स स्वच्छ करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
तसेच मडगावमध्ये "कचरा जाळणे" ही मडगाव (Madgaon) नगरपरिषदेसाठी वैज्ञानिक पद्धत असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. तर मनपा उद्यान, अॅना फोंटे उद्यान आणि रस्त्याच्या कडेला साफसफाई करताना आणि काळे डाग साफ करताना कचरा जाळणे हे मनपा कामगारांचे नित्याचेच झाले आहे. अशा कचरा जाळण्यामुळे होणारे प्रदूषण अधिकाऱ्यांसाठी किमान चिंतेचे असल्याचे सांगत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
घरोघरी कचऱ्याचे संकलन वेगळ्या पद्धतीने होत नाही हे सामान्य ज्ञान असले तरी, ब्लॅक स्पॉट्सवरील कचरा एका जागी जमा होतो. आणि तो जाळला जात आहे. कचरा विल्हेवाटीच्या नियमांच्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (pollution ) मार्गदर्शक तत्त्वांच्या हे विरुद्ध आहे.
त्याचबरोबर कौटिन्हो यांनी सांगितले की, आज बापू पर्यावरण सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रावणफोंड येथील ओव्हर ब्रीजजवळ साचलेला कचरा एकत्र करून तो वेगळा करून नगरपरिषदेच्या वाहनांना देण्याऐवजी जाळून टाकला. ही वस्तुस्थिती अधोरेखित करण्याचा उद्देश हाच आहे की, या एजन्सीची बिले संबंधित पर्यवेक्षक/अभियंत्यांकडून प्रमाणित केली जात आहेत. मात्र साइटवर कचऱ्याच्या उठावारून जे दिसत आहे ते त्याच्या अगदी विरुद्ध सध्या होताना दिसत आहे. यावेळी SCM संयोजकांनी नगरपरिषदेच्या निष्काळजी वृत्तीचा निषेध केला. तसेच त्यांनी, "आम्ही करदात्यांच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ असे म्हटले आहे. तसेच याप्रकरणी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही कौटिन्हो यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.