Purple Fest: दृष्टी-श्रवणबाधितांना दृष्टी आणि श्रवण दोन्ही नसल्यामुळे त्यांना माहितीसाठी ''टॅकटाइल दुभाषी (दृष्टी-श्रवणबाधितांना त्यांच्या भाषेत समजावणारा)'' वर अवलंबून राहावे लागते. अशा दृष्टी-श्रवणबाधितांपर्यंत लैंगिकतेबाबत माहिती पोचविण्यासाठी लिंग आणि लैंगिकता हा विषयावर 4 ते 6 जानेवारीला विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारितास संस्थेचे प्रकल्प समन्वयक गेबल मास्कारेन्हास यांनी दिली.
ते पुढे म्हणाले हे विशेष सत्र जुने गोवे येथील सेंट जोसेफ वाझ स्पिरिच्युअल रिन्युवल सेंटरमध्ये होणार आहे. यात देशभरातील एकूण 130 दृष्टी-श्रवणबाधित युवकांसोबत त्यांचे पालक आणि प्रशिक्षकही उपस्थित राहणार आहेत.
या तीन दिवसांत ''लिंग आणि लैंगिकता'' संबंधी विविध पैलू उलगडले जातील. या तीन दिवसांचे प्रशिक्षण भविष्यातही उपयोगी पडावे यासाठी पालक आणि प्रशिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. दृष्टी-श्रवणबाधितांच्या सक्षमीकरणासाठी सेन्स इंडिया 1997 पासून 23 राज्यांमध्ये काम करत आहे.
प्रथमच भारतात युनिफाईड बीच क्रिकेट
पर्पल फेस्टमध्ये 4 ते 8 जानेवारी क्रीडा फेस्टिव्हल दरम्यान होणार आहे. यात अखिल भारतीय ओपन पॅरा टेबल टेनिस स्पर्धा, युनिफाइड बीच क्रिकेट, अंधांसाठीची क्रिकेट स्पर्धा तसेच पर्पल -रन गोवा मॅरेथॉन यांचा समावेश आहे. पॅरा-टेबल टेनिस हा शारिरीक विकलांगतेनुसार 10 श्रेणींमध्ये विभागणी केली जाते.
युनिफाईड बीच क्रिकेट भारतात प्रथमच दाखल होत आहे. बीच क्रिकेट हा क्रिकेटचा आरामशीर प्रकार आहे, जो कोणीही खेळू शकतो.पर्पल आय-रन गोवा मॅरेथॉन ही 21विकलांग प्रकारांसाठी गोव्याची पहिली राष्ट्रीय मॅरेथॉन आहे.
व्हिक्टर आर. वाझ, युनिफाइड बीच क्रिकेटचे समन्वयक-
पॅरा टेबल टेनिस या खेळामुळे विकलांग खेळाडूंनाही प्रकाशझोतात आणण्याची किमया साधली आहे. पॅरा टेबल टेनिस खेळ शारिरीक सुसूत्रता वाढवणेसाठी उपयुक्त ठरत आहे. शिवाय पर्पल फेस्टच्या निमित्ताने भारतात प्रथमच युनिइफाईड बीच क्रिकेट हा क्रीडाप्रकार सादर होत असल्याचा आनंद आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.