Water Dispute: 'हा' प्रश्न सोडवण्यात सरकार अजूनही अपयशी, साबांखा मंत्र्यांचा कबुलीनामा

राज्यातील अनेक भागांत तीव्र पाणी टंचाई , सरकारकडून प्रयत्नांची हमी
Water Dispute
Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Water Dispute राज्यात सर्व ठिकाणी किमान चार तास पाणी मिळावे, अशी आमची इच्छा आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. राज्यातील सर्व भागांत चार तास पाणी देण्यात सरकारला अपयश आल्याची कबुली आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

आज माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘पेडणेत पाण्याच्या टाकीसाठी जागा नाही. त्यामुळे खासगी क्षेत्रातील जमीनधारकाने सहकार्य केल्यास तेथील पाणी प्रश्‍न सुटू शकतो.

कोणताही प्रकल्प बांधण्यास घेतल्यास त्यास वेळ लागतो. पाण्याच्या प्रश्‍नावर आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे विषय मांडलेला आहे, असे त्यांनी सांगितले.

Water Dispute
Goa Traffic: वाहनचालकांना दिलासा! म्हापसा-पणजी मार्गावरची वाहतूक कोंडी सुटणार

‘पेडणेत आपण गेलो, तेव्हा तेथे पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले. पर्वरीतील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी वाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हादईच्या विषयावर मुख्यमंत्री बोलत असतात. म्हादईच्या प्रश्‍नावर केंद्र सरकारने राज्यात लवादाची नियुक्ती केली आहे. त्यासाठी अधिसूचना जारी झाली आहे.

ही राज्यासाठी महत्त्वाची बाब आहे. रस्‍त्यावरील खड्ड्याविषयी ॲप आणले आहे. अशा ॲपशी लोक जोडले तरच त्याचा फायदा होतो’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यातील अनेक भागांत सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. ही टंचाई शहरी भागांसह ग्रामीण भागातच होत असल्याचे दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com