Goa Traffic: वाहनचालकांना दिलासा! म्हापसा-पणजी मार्गावरची वाहतूक कोंडी सुटणार

उड्डाणपुलासाठी केंद्राकडून 641कोटी रुपये मंजूर- गडकरी
Goa Traffic
Goa TrafficDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मध्ये येणाऱ्या सांगोल्डा जंक्शन ते मॅजेस्टिक हॉटेलपर्यंतचा 5.15 किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासाठी केंद्र सरकारने 641 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

‘हा रस्ता राष्ट्रीय महामार्गावर येतो. मात्र, जमीन संपादन आणि इतर तांत्रिक बाबींमुळे प्रलंबित आहे. आता यासाठी आवश्यक असलेल्या निधी मंजूर करण्यात आल्याने हा सहापदरी उड्डाणपूल आणि इतरचे जोड रस्ते लवकरच पूर्ण होतील.

यामुळे म्हापशाकडून पणजीकडे येणारी वाहतूक सुरळीत होईल. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्याचा वाहनचालक, प्रवाशांना त्रास होतो. याशिवाय या उड्डाणपुलामुळे पर्यटन आणि इतर उद्योगांना चालना मिळेल,’ असेही गडकरी म्हणाले.

Goa Traffic
G20 Summit Goa 2023: जागतिक उद्दिष्टापूर्वीच भारत क्षयरोग मुक्त होणार- डॉ. मांडविय

5.15 किमी लांबी

अटलसेतू झाल्‍याने दिलासा मिळाल्‍यानंतर पर्वरी भागात उड्डाणपूल व्‍हावी, अशी जोरदार मागणी होऊ लागली. राज्‍य सरकारने त्‍यासाठी केंद्राकडे प्रस्‍तावही दिला होता.

अखेर ५.१५ किलोमीटर लांब व सहापदरी उड्डाणपूल मंजूर झाला आहे. त्‍यामुळे व्‍यावसायिक व निवासी संकुलांचेही नुकसान टळणार आहे. तसेच वाहतूक कोंडीवर तो उतारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com