Water Problem
Water ProblemDainik Gomantak

काणका-वेर्ला परिसरात तीव्र पाणी टंचाई

आमदार दिलायला लोबो: समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार
Published on

शिवोली: शिवोली पंचक्रोशीतील काणका-वेर्ला परिसरात गंभीर पाणी समस्या आहे. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या सोडविणे आवश्‍यक आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे आमदार दिलायल लोबो यांनी यावेळी स्पष्ट केले.

कणका-वेर्ला पंचायत कार्यालयात आमदार दिलायला लोबो यांनी पाणी टंचाईवरून संबंधित अधिकाऱ्यांची शनिवारी विशेष बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी अभियंत्यावर निष्क्रियतेचा आरोप केला. पंचायत क्षेत्रातील विविध भागात पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण तीन ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आलेले आहेत.

Water Problem
फोंड्यात सार्वजनिक शिगमोत्सव उत्साहात!

परंतु अस्नोडाहून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा दाब म्हापसा शहरापर्यंत पोहोचेपर्यंत कमी होत असल्याने त्याचा परिणाम या भागातील पाणी पुरवठ्यावर होत असल्याचे ज्युनिअर अभियंते विनय यांनी यावेळी सांगितले. परंतु अभियंत्यासह पाणी विभागाशी संबंधित ऑपरेटर्स या भागातील अनियमित पाणी पुरवठ्याला जबाबदार असल्याचे मत पंच सदस्य दिगंबर यांनी मांडले.या भागातील कांही वस्त्या जमिनीच्या सपाटीपासून थोड्या वरच्या भागात असल्याने या भागातील रहिवाशांना नेहमीच पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे महिलांबरोबरच इतरांचीही फरफट होत असल्याचा आरोप यावेळी अनिल हळर्णकर यांनी केला.

Water Problem
Goa Corona Updates: दिवसभरात 5 जणांना कोरोनाची लागण

यावेळी सरपंच अमिता वासुदेव कोरगांवकर, उपसरपंच वृषाली आर्लेकर, बाळा नाईक, दिगंबर कळंगुटकर, व्रुषाली आर्लेकर, निकॉल मार्टीन्स, लक्ष्मीकांत बिचोलकर, नितीन लिंगुडकर तसेच आबास डिसौझा उपस्थित होते. सरपंच अमिता कोरगांवकर यांनी नवनियुक्त आमदार दिलायला लोबो यांचा पुष्पहार अर्पण करून सन्मान केला. जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष वासुदेव कोरगांवकर यांनी गुरुवारी पणजीत झालेल्या बैठकीत शब्द देऊन सुद्धा वरिष्ठ अभियंते संतोष म्हापणे बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com