फातोर्डा : सतरा वर्षीय पालोमा व्हिएगशला प्रतिष्ठेच्या डायना पुरस्काराने (Diana Award) आज सन्मानित करण्यात आले. पालोमा ही प्रविण व सोफिया व्हिएगश यांची कन्या. त्यांचे मुळ घर लोलये काणकोण (Canacona) पण पालोमा दुबईतील जेम्स अवर ओन इंग्लिश हायस्कुलमध्ये शिकत आहे.(17-year-old girl from Goa receives prestigious Diana Award)
पालोमा ही मानसीक आरोग्य प्रचारक (Mental health promoters) असुन तिची या संदर्भात एक वेबसाईट पण आहे. मानसीक आरोग्याबद्दल ती शाळांमध्ये मार्गदर्शन करीत आहे. तिने हवा शुद्धीकरणासाठीच्या नमुन्याचा शोध लावला असुन त्यापासुन लोकांना हवा दुषितीकरणापासुन संरक्षण मिळते. आपले जिवन दुसऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी अर्पित करण्यासाठी तिचा वकिल बनण्याचा मानस आहे. तिला हा जो पुरस्कार मिळाला आहे तो प्रिंसेस ऑफ वेल्स डायना हिच्या स्मृतिप्रितर्थ्य प्रायोजित करण्यात आला आहे.
हा पुरस्कार देणारी जी धर्मादाय संस्था आहे त्यास डायनाचे दोन्ही पुत्र द ड्युक ऑफ कॅम्ब्रीज व द ड्युक ऑफ ससेक्स यांचे पाठबळ आहे.ह्या पुरस्काराचे विजेते निवडताना कठीण अशी प्रक्रिया अवलंबिली जाते. या पुरस्कारासाठी ज्याचे नामांकन झाले आहे त्या व्यक्तिची दृष्टी, सामाजिक परिणाम, दुसऱ्यासाठी स्फुर्तीदायकता, युवा नेतृत्व व सेवा प्रवास अशा पांच गुणांचा अभ्यास केला जातो.
फातोर्डाचे (Fatorda) आमदार, गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी पालोमा तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. सुनिता व प्रविण गोवा फॉरवर्डचे सदस्य असुन त्यांनी संयुक्त अरब अमारतीमध्ये गोवा फॉरवर्डची मुहुर्तमेढ रोवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.