शक्य तितक्या लवकर दुसरे वैद्यकीय महाविद्यालय उभारा- ओबीसी महासंघाची मागणी

मधू नाईक : ओबीसी, ‘एसटी’साठी लाभदायक ठरणार
Madhu Naik at the press conference of OBC Federation in Ponda
Madhu Naik at the press conference of OBC Federation in PondaGomantak Digital Team

फोंडा : राज्यातील दक्षिण गोव्यात सरकारचे दुसरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली असून हे वैद्यकीय महाविद्यालय शक्य तेवढ्या लवकर साकारून वैद्यकीय सेवेचा लाभ गोमंतकीयांना द्यावा.

त्याचबरोबर ओबीसी तसेच एसीएसटीवाल्यांच्या आरक्षणासाठी हे दुसरे वैद्यकीय महाविद्यालय उपयुक्त ठरणार असून ते बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ठेवावे, अशी मागणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.

Madhu Naik at the press conference of OBC Federation in Ponda
Ponda Panchayat News : फोंड्यातील कामे वेळेतच पूर्ण करणार : नगराध्यक्ष

ओबीसी, एससी, एसटीसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सरकारने आरक्षण दिल्याने मधू नाईक व सहकाऱ्यांनी सरकारचे यावेळी आभार मानले. यावेळी मधू नाईक यांच्यासमवेत विवेक वेरेकर, सांतान परेरा, शांताराम केरकर, बाया नाईक उपस्थित होते. मधू नाईक म्हणाले की, नुकतीच ओबीसी महासंघाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यात दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची चर्चा झाली,त्यांनी मागणीची दखल घेतली.

Madhu Naik at the press conference of OBC Federation in Ponda
Ponda Panchayat News : कुर्टी-खांडेपार पंचायतीची स्थैर्याकडे वाटचाल; भाजपचे वर्चस्व

ओबीसीसाठी वेगळे खाते! : ओबीसी कल्याणासाठी एसटीच्या धर्तीवर वेगळे खाते तयार करावे. गेला बराच काळ ओबीसी तसेच इतर बहुजन समाजातील जातींची जनगणना झालेली नाही, या जनगणनेचे काम त्वरित हाती घ्यावे.

राज्यात लोकप्रतिनिधी निवडीवेळी ओबीसी व एससीएसटीवाल्यांचे योगदान फार मोठे आहे. विशेषतः ओबीसींची संख्या साठ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने बहुजन समाजाचाच आधार लोकप्रतिनिधींना निवडणुकीसाठी घ्यावा लागतो, म्हणून या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, असे मधू नाईक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com