Ponda Panchayat News : फोंड्यातील कामे वेळेतच पूर्ण करणार : नगराध्यक्ष

फोंडा तालुक्यातील सर्व पंचायतींची माॅन्‍सूनपूर्व कामांना सुरूवात
Ritesh Naik
Ritesh NaikGomantak Digital Team

फोंडा तालुक्यातील सर्वच पंचायतींनी माॅन्‍सूनपूर्व कामांना सुरूवात केली आहे. पण ही कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. फोंडा पालिकेत दोनच दिवसांपूर्वी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची निवड झाल्यामुळे आता या कामांना चालना मिळाली आहे. माॅन्‍सूनपूर्व कामे पावसाआधी पूर्ण होतील, अशी ग्वाही नूतन नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली.

गटारांची स्वच्छता, झाडाझुडपांची छाटणी, नाल्यांची सफाई आदी कामांनी वेग घेतला आहे. जलस्त्रोत खात्याने गेल्या वर्षी या नाल्यांची स्वच्छता केली होती. पण नाल्यात कचरा टाकण्याच्या प्रकारामुळे आता ते पुन्हा साफ करावे लागणार आहेत. फोंडा पालिका क्षेत्रातील सर्वच प्रभागांत मान्सूनपूर्व कामांसाठी जादा रोजंदारी कामगारांना घेण्यात आले आहे. येत्या दहा-बारा दिवसांत कामे पूर्ण होतील, असे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.

Ritesh Naik
Cannes 2023: ऐश्वर्याची आराध्यासह कान्सवारी... जंगी स्वागताचा व्हायरल व्हिडिओ

आपत्ती व्यवस्थापनासाठी हवी तयारी

फोंडा तालुका हा डोंगराळ प्रदेश. दोन्ही बाजूंनी डोंगर आणि मध्येच रस्ता असे समीकरण बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे अनेकदा झाडे मोडून रस्त्यावर कोसळतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात आपत्कालीन वेळेत व्यवस्थापन उपलब्ध होणे मुश्‍किलीचे ठरते.

Ritesh Naik
Valpoi News : वाळपईतील कामे ३० मेपर्यंत पूर्ण करणार : मुख्याधिकारी

फोंड्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आपत्कालीन विभाग कार्यरत केला जातो, पण ही सेवा तुटपुंजी ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी खांडेपार व उसगाव भागात पूर आला होता. त्यावेळी आपत्कालीन सेवेचा फज्जा उडाला होता. त्यामुळे निदान आता तरी पावसाळ्यापूर्वी आपत्कालीन विभाग पूर्णपणे कार्यरत करा, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com