'सेरेंडिपिटी'त आगीच्या घटनेची पुनरावृत्ती, गेल्या वर्षीच्या 8 डिसेंबरची आठवण; कला अकादमीत सेट जळाला

Serendipity festival fire: हडफडेतील नाईट क्लबच्या भीषण दुर्घटनेची धग अजून शांत झाली नाही, तोच राजधानीत सोमवारी संध्याकाळी ‘सेरेंडिपिटी’ महोत्सवाच्या तयारीदरम्यान पुन्हा आग लागण्याची घटना घडली.
Goa fire incident
Goa fire incidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हडफडेतील नाईट क्लबच्या भीषण दुर्घटनेची धग अजून शांत झाली नाही, तोच राजधानीत सोमवारी संध्याकाळी ‘सेरेंडिपिटी’ महोत्सवाच्या तयारीदरम्यान पुन्हा आग लागण्याची घटना घडली. कला अकादमी परिसरातील सजावटीच्या साहित्याला अचानक आग लागल्याने काही काळ मोठी धावपळ उडाली. मात्र, कामगारांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेआणि अग्निशामक दलाच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

असाही ‘योगायोग’; सलग दुसरे वर्ष

आगीची सोमवारची घटना विशेष ठरते कारण, ८ डिसेंबरला २०२४ रोजी ‘सेरेंडिपीटी’ महोत्सवच्या तयारीदरम्यान गेल्या वर्षी आयनॉक्स परिसरातील तात्पुरत्या रंगमंचाला आग लागली होती. यावर्षी कला अकादमीजवळील सजावटीच्या सेटमध्ये आग भडकली. दोन्ही वेळा वेल्डिंग किंवा शॉर्टसर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे. सलग दुसऱ्या वर्षी घडलेल्या या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Goa fire incident
Goa Nightclub Fire: नाईट क्लब दुर्घटना प्रकरणात 'पाचवी' अटक, भरत कोहलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मालकाचा शोध सुरु

महोत्सवासाठी सेट तयार करण्याचे काम सुरू असताना उंचीवर चालू असलेल्या वेल्डिंगमधून ठिणगी उडून प्लायवूड व स्पंजसारख्या ज्वलनशील साहित्याला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

Goa fire incident
Goa Beach: गोव्याच्या किनारपट्टीत झाला मोठा बदल! 1970 नंतर झाली 'इतकी' किमी वाढ..

कामगारांनी तातडीने जळणाऱ्या साहित्याकडे धाव घेतली. कामगारांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, असे अग्निशमन अधिकारी रुपेश सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com