Sameer Panditrao
गोव्याच्या किनारपट्टीबाबत केंद्र सरकारने नवी माहिती दिली.
नव्या माहितीनुसार राज्याची किनारपट्टी अधिकृतरीत्या ३३ किलोमीटरने वाढली आहे
नव्या मोजणीप्रमाणे गोव्याची किनारपट्टी आता एकूण १९३ किलोमीटर इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सत्तरच्या दशकात नोंद असलेली लांबी १६० किमी होती.
पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, नव्या मोजणीमुळे भावी किनारी नियोजन, पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणांमध्ये अचूकता येणार आहे.
गोव्याच्या दृष्टीने वाढलेली किनारपट्टी दीर्घकालीन पायाभूत सुविधा, बंदर विकास, तसेच विशिष्ट पर्यटन पट्ट्यांची ओळख या सर्व क्षेत्रांत नवे मार्ग उघडत आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, नव्या सर्वेक्षणामुळे आर्थिक विकास आणि समुद्रकिनारी हवामान-तयारी या दोन्हीसाठी अधिक अचूक नियोजन करण्यास मदत होणार आहे.